Badlapur Crime : पार्किंगवरून वाद! बदलापुरात दोन गटात तुफान हाणामारी; संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

गाडी पार्किंग करण्याच्या वादातून ही हाणामारी झाली आहे.
Badlapur Crime
Badlapur CrimeSakal

बदलापूर : बदलापूर येथील गांधी चौक परिसरात दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. गाडी पार्किंग करण्याच्या वादातून ही हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हाणामारीची ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गांधी चौक परिसरात एक तरुण गाडी पार्किंग करत असताना शेजारी असलेल्या तरुणांनी त्याला हटकत वाद घातला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दुसऱ्या गटाच्या सदस्याने आपल्या साथीदारांना बोलवून घेत पुन्हा हाणामारी केली.

Badlapur Crime
Sharad Pawar : वैजनाथाचे दर्शन अन् ७०० गाड्यांचा ताफा! धनंजय मुंडेना आव्हान देणाऱ्या नेत्याची शरद पवार गटात धडाकेबाज एंट्री

दोन्ही गटाकडून ही हाणामारी होत असताना ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. दरम्यान या प्रकरणी तक्रार देण्यासाठी कोणीही आलेले नसल्याने बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही, पोलिसांच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com