
बदलापूर : २६ जुलै म्हटलं की बदलापूरकरांना पुराची भीती सतावत असते. २६ जुलै च्या आदल्या दिवशीच म्हणजेच २५ जुलै रोजीच पावसाने शहरात दमदार हजेरी लावली असून दिवसभरात जवळपास १०० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून बदलापूरच्या उल्हास नदीने पुराच्या पाण्याची इशारा पातळी गाठली आहे. सध्या उल्हास नदीच्या पाण्याची पातळी ही १६.५० इतकी असून, नदीची धोक्याची पातळी ही १७.५० इतकी आहे. त्यामुळे पाऊस जर असाच पडत राहिला तर, यंदा देखील २६ जुलै ला पूर परिस्थिती निर्माण होईल की काय? या भीतीने बदलापूरकरांना धडकी भरली आहे.