Badlapur News : अखेर लोडशेडींग मधून बदलापूरकर मुक्त होणार; आमदारांच्या प्रयत्नांना यश!

२२० केव्ही जांभूळ अतिउच्च दाब उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात!.. उन्हाळा सुरू झाल्यानंतर बदलापुरात सततच्या होणाऱ्या लोड शेडिंगला नागरिक पुरते हैराण झाले आहेत.
Badlapur News
Badlapur Newssakal

बदलापूर : उन्हाळा सुरू झाल्यानंतर बदलापुरात सततच्या होणाऱ्या लोड शेडिंगला नागरिक पुरते हैराण झाले आहेत. या सगळ्या त्रासाचा फटका कुठेतरी त्या लोकसभा निवडणुकीला बसणार याची जाणीव असतानाच, शहरातील लोडशेडिंग ला पर्यायी उपाय म्हणून, बदलापूर अंबरनाथ मधील जांभूळ येथील अतिउच्चदाब उपकेंद्रातून, २२० केव्ही वीज उचलण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या ३० एप्रिल पर्यंत ५० एमव्हीए क्षमतेचा पहिला ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित होणार आहे.

त्यामुळे महापारेषणच्या १००/२२ मोरिवली उपकेंद्रावरील भार कमी होऊन, बदलापूर शहरात होत असलेली लोडशेडिंग बंद होणार असून, बदलापूर पाठोपाठ अंबरनाथ शहर सुद्धा यामुळे, लोड शेडिंग मुक्त होणार आहे. या कामाची दखल स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी घेतली असून, त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहेm त्यामुळे १ मे महाराष्ट्र दिनापासून बदलापूरकर लोड शेडींग मुक्त होणार आहेत.

जांभूळ उपकेंद्रात ५० एमव्हीए क्षमतेचे दोन ट्रांसफार्मर बसवण्यात येणार आहेत. यातील पहिला ट्रान्सफॉर्मर हा १९ एप्रिलला छत्रपती संभाजी नगरहून रवाना झाला असून, ३० एप्रिल पर्यंत तो कार्यान्वित करण्यात येईल. या उपकेंद्रातून निघणाऱ्या चार पैकी दोन उच्चदाब वीज वाहिन्यांचे काम पूर्ण झाले असून, या वाहिन्या त्याच वेळी कार्यान्वित करण्यात येतील. त्यामुळे अंबरनाथ येथील मोरिवली उपकेंद्रा वरील भार कमी होऊन, ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा होण्यात मोठी मदत मिळणार आहे. कारण सध्या या भागाला मोरीवली १००/२२ केव्ही उपकेंद्रातून, वीज पुरवठा होतो. वाढते तापमान आणि रात्रीच्या वेळी विजेची वाढलेली मागणी यामुळे, महापारेषण कडून या समस्येवर उपाय म्हणून लोड रिलीफ मागितला जात आहे.

जांभूळ उपकेंद्राचा पहिला टप्पा कार्यान्वित होण्यापूर्वी स्थानिक स्तरावर उपलब्ध स्त्रोतांच्या आधारे, विज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याकडे आमदार किसन कथोरे यांनी जातीने लक्ष दिलेले आहे. यात आवश्यकतेनुसार गोवेली फिडरवर, मोहन सबर्बिया फिडरचा भार आणि आनंदनगर स्विचींगच्या च्या पालेगाव येथील, फिडरवर अंबरनाथ मधील ६ नंबरच्या फीडरचा भार, फिरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरून महापारेषण कडून रिलीफ मागितल्यानंतर महावितरणच्या ग्राहकांचा वीज पुरवठा बाधित होणार नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून बदलापूर शहरात विजेचा वापर वाढला असून, उन्हाळ्याच्या उकाड्यात एसी, पंखे यामुळे वाढत्या विजेचा भार कमी करण्यासाठी जांभूळ उपकेंद्रातून वीज पुरवण्यात येणार आहे. याच बरोबर भविष्यात बदलापूर शहरात कधीच लोडशेडींग होऊ नये यासाठी टाटा कंपनीचा प्रकल्प लवकरच बदलापुरात कार्यान्वित होण्यास सुरुवात होईल. यासाठी आवश्यक सगळ्या तांत्रिक आणि शासकीय बाबींची पूर्तता अंतिम टप्प्यात असून, बदलापूर हे शहर पूर्णतः लोडशेडींग मुक्त करण्यासाठी ही कामे लवकरच पूर्ण करणार आहे.

आमदार किसन कथोरे

मुरबाड विधानसभा मतदारसंघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com