Dombivali Crime : पैशांसाठी चोरली बॅग, त्यात निघाले डिटोनेटर; दोघांना अटक

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात डिटोनेटर प्रकरणात दोघांना अटक
Crime
Crimesakal

डोंबिवली - कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात 54 डिटोनेटर असलेली एक बॅग आढळून आली होती. याप्रकरणी दोन जणांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. जॉय डेव्हिड कालवा उर्फ नायडु, ऋषीकेश देविदास निकुंभ अशी अटक आरोपींची नावे आहेत.

चोरी करण्यासाठी या दोघा आरोपींनी स्कायवॉक वरील एका जोडप्याची बॅग चोरली. त्यातील महत्वाचे सामान चोरुन डिटोनेटरसह बॅग कल्याण रेल्वे स्थानकात सोडून पळ काढला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आता हे जोडपे कोण होते, त्यांच्याजवळ डिटोनेटर कसे आले याचा शोध पोलीस घेत आहेत.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात फलाट क्रमांक 1 जवळ एका झाडाखाली चार दिवसांपूर्वी एक बेवारस बॅग आढळून आली. याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळताच डॉग स्कॉड, बॉम्ब शोधक पथक, विशेष तपास पथक यांनी बॅग ची पाहणी केली असता त्यात 54 इलेक्ट्रिक डिटोनेटर आढळून आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

याप्रकरणी गुन्हा दाखल करत रेल्वे पोलीस, जीआरपी पोलिसांनी तपास सुरू केला होता. परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले आहेत. त्यात दोन व्यक्ती या स्टेशन परिसरात बॅग सोडून जात असताना आढळून आल्या होत्या.

डीसीपी मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी तपास सुरू केला, त्यासाठी काही पथकांची नेमणूक केली गेली. तपास पथकाने बदलापूर येथुन जॉय याला तर भिवंडी येथून ऋषिकेश याला अटक केली आहे. पोलिसांनी या दोघांना कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता रेल्वे न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. जॉय व त्याचा मित्र अनिल हे त्याच्या मैत्रिणीला सोडण्यासाठी बाहेरगावी गेला होता. 21 जानेवारीला सकाळी जॉय व अनिल हे कल्याण रेल्वे स्थानकात उतरले. त्यांना भूक लागलेली असल्याने त्यांनी स्कायवॉक वरील एका जोडप्याची बॅग चोरली. त्या बॅग मध्ये काय आहे ये पाहण्यासाठी ते झाडाखाली गेले. त्यातील महत्वाचे सामान चोरून डिटोनेटर तेथेच सोडून त्यांनी पळ काढला. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

ज्या जोडप्याची बॅग या चोरट्यानी चोरली ते जोडपे कोण, त्यांनी डिटोनेटर बॅग मध्ये का बाळगले होते याचा पोलीस तपास करत आहेत. बॅग ठाणे स्थानकातून चोरी झाली आहे की कल्याण रेल्वे स्थानकातून याविषयी पोलिसांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता कोणते वळण घेतो पहावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com