प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटियाला कोरोनाची लागण

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 4 October 2020

बाहुबली फेम प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटियाला कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबई- बाहुबली फेम प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटियाला कोरोनाची लागण झाली आहे. तमन्ना सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. 'कन्नड प्रभा'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. तमन्नाच्या आई-वडिलांना काही दिवसांपूर्वी कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. 

तमन्ना साऊथ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बाहुबली चित्रपटामुळे ती हिंदी सिनेमात प्रकासझोतात आली. आई-वडिलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर, तमन्नानेही कोरोना चाचणी केली होती. तिचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तमन्नाच्या आई-वडिलांची प्रकृती आता चांगली आहे. 

दरम्यान, तमन्ना भाटियाला कोरोनाची लागण झाल्याचे समजतात तिच्या लाखो चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. शिवाय ती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी त्यांनी देवाकडे प्रार्थना केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bahubali actor tamanna bhatia infected with corona virus