बाजारात आलाय 'बाहुबली' कांदा, एका कांद्याचं वजन आहे...

निलेश मोरे
मंगळवार, 14 जानेवारी 2020

नवी मुंबईच्या वाशी APMC म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीत कायम अनोख्या प्रकारची फळं त्याचबरोबर भाज्या येत असतात. जगाच्या पाठीवर कोणतंही अनोखं उत्पादन घेतलं गेलं ते वाशी मार्केटमध्ये आलेलं पाहायला मिळतं. अशात नवी मुंबईतील वाशी APMC आता बाहुबली कांदा आलाय. आता याला बाहुबली कांदा का म्हणतात बरं ? 

नवी मुंबईच्या वाशी APMC म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीत कायम अनोख्या प्रकारची फळं त्याचबरोबर भाज्या येत असतात. जगाच्या पाठीवर कोणतंही अनोखं उत्पादन घेतलं गेलं ते वाशी मार्केटमध्ये आलेलं पाहायला मिळतं. अशात नवी मुंबईतील वाशी APMC आता बाहुबली कांदा आलाय. आता याला बाहुबली कांदा का म्हणतात बरं ? 

सध्या देशभर कांद्याच्या अव्वाच्या सव्वा भावाने लोकांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. तब्बल 100 ते 150 किलोच्या भावाने मिळणारा कांदा आता कुठे  70 ते 80 रुपये किलोने मिळायला लागलाय. मात्र नवी मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये थेट इजिप्तहुन जड वजनाचा कांदा आला आहे. इजिप्तच्या कांद्यांना मोठ्याप्रमाणात विरोध देखील झालेला या आधी आपल्याला पाहायला मिळालं होतं. अशात आता इजिप्तहून थेट वाशीत आलाय बाहुबली कांदा. 

VIDEO - राष्ट्रवादीचे नेते मलिक यांची दादागिरी, रस्ते कामगारांना मारहाण..

एक कांदा 640 ग्रॅम वजनाचा  

आकाराने मोठा असलेला कांदा याचे वजन 640 ग्रॅम भरत आहे . पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलोमध्ये आकाराने लहान 6 ते 7 कांदे बसतात. मात्र अर्ध्याकिलोपेक्षा 140 ग्रॅम जास्त असलेला वजनाचा कांदा थेट वाशी मार्केट मध्ये दाखल झाला आहे.

सध्या हा कांदा 50 ते 60 किलोच्या भावाने मिळत आहे. 60 रुपये किलो दराने बघितलं तर 640 ग्रॅम वजनाचा एक कांदा 35 रुपये तर, किलो मागे फक्त दोन कांदे बसतात. भारतीय कांद्याच्या आकाराने मोठा आणि पॉलिश केलेला इजिप्तच्या या कांद्याची चव भारतीय कांद्यासारखी नसल्याची प्रतिक्रिया ग्राहक करत आहेत.

मोठी बातमी - आर्थिक मंदीचा फटका, 'इतक्या' लाख नोकऱ्या झाल्यात कमी..

bahubali onion arrived in vashi apmc market weight 640 grams for unit


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bahubali onion arrived in vashi apmc market weight 640 grams for unit