esakal | आर्थिक मंदीचा फटका, 'इतक्या' लाख नोकऱ्या झाल्यात कमी..
sakal

बोलून बातमी शोधा

आर्थिक मंदीचा फटका, 'इतक्या' लाख नोकऱ्या झाल्यात कमी..

आर्थिक मंदीचा फटका, 'इतक्या' लाख नोकऱ्या झाल्यात कमी..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - देशभरात आर्थिक मंडी तोंड वर काढताना पाहायला मिळतेय. अशात एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. बातमी आहे आहे चिंता वाढवणारी. यंदा सुरु असलेल्या आर्थिक वर्षात तब्बल १६ लाख नोकऱ्या कमी झाल्यात. हे आम्ही नाही म्हणत, एसबीआय रिसर्च रिपोर्ट इकोरॅपच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे, देशात मोठ्या प्रमाणावर मंदीचं सावट असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याचाच परिणाम आता रोजगारावर पडताना पाहायला मिळतोय. 

बापरे - भयंकर, धक्कादायक.. वसईत विद्यार्थ्यांना गुदमरण्याचे प्रशिक्षण?

या अहवालानुसार मागील वर्षात देशात ८९.७ लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली होती. यामधल्या यंदा सुरू असलेल्या आर्थिक वर्षात तब्बल १६ लाख नोकऱ्या कमी झाल्या आहेत. नोकरीच्या निमित्ताने देशभरातील तरुण प्रमुख शहरांकडे स्थलांतर करतात. अशात महाराष्ट्र आणि गुजरात सारख्या राज्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर तरुण येत असतात. मात्र महाराष्ट्र आणि गुजरात सारख्या राज्यांमध्ये नोकरीच्या संधी कमी झाल्यामुळे याचा मोठा फटका रोजगार निर्मितीवर झालेला पाहायला मिळतोय. 

आणखी वाचा - संजय राऊत म्हणतात 'आमचं थोडं मिस कम्युनिकेशन झालं'

बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थानमधील अनेक तरुण नोकरीसाठी परराज्यात स्थलांतरित होतात. त्यांच्याकडून घरी पाठवण्यात येणाऱ्या रक्कमेत देखील घट झाल्याचं या अहवालातून समोर येतंय. तज्ज्ञांच्यामते येत्या काळात भारतातील मंदी आणखी तोंडवर काढताना पाहायला मिळणार आहे. अशात याचा आता देशातील रोजगार निर्मितीवर किती आणि कसा परिणाम होतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. 

financial slowdown resulted in reduction of jobs in india