Dasara Melava 2001: दहशतवाद रोखण्यास आणीबाणीच हवी ! आठवणी बाळासाहेबांच्या; दस्तावेज 'सकाळ'चे

Balasaheb Thackeray:
Balasaheb Thackeray:sakal

Balasaheb Thackeray: 2001 साली झालेल्या दसरा मेळाव्यावेळी बाळासाहेबांचे भाषण चांगलेच गाजले होते. त्यावेळी बाळासाहेबांनी दहशतवादाविषयी आपली रोकठोक भूमिका मंडली.

दहशतवाद रोखण्यासाठी व शिस्त आणण्यासाठी देशात एक ना एक दिवस आणीबाणी आणावीच लागेल, असे सांगतानाच हिंदूंनी आता शस्त्रे हाती घेऊन पुढील लढाईसाठी ती परजून ठेवावीत, असे आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी २००१ साली सभेत केले होते. त्याचबरोबर जातीयवादी मुस्लिमांना कितीही विरोध केला, तरी अमेरिकेवर हल्ला करणाऱ्यांच्या मेंदूची तारीफच करावी लागेल,असेही ते म्हणाले.

दसऱ्यानिमित्त शिवाजी पार्कवर आयोजित केलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना ठाकरे म्हणाले, की अमेरिका - स्वतःला तुफान शक्ती समजत होती. तरीही दहशतवाद्यानी त्यांचीच विमाने पळवून त्यांच्याच वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेटॅगॉनच्या इमारतीवर हल्ला केला. दुसऱ्या बाजूला भारतीय सैन्याची जबरदस्त ताकद असतानाही आपण केवळ दहशतवादाविरोधी चर्चा करीत बसलो आहोत. आपल्या जवानांना त्यांची शक्ती दाखविण्याची संधी द्या मग ते सिमेपलीकडील दहशतवाद संपवून टाकल्याशिवाय राहणार नाहीत.

Balasaheb Thackeray:
Sakal Podcast: सरकारनं दिली EWS ची जाहिरात ते शमीनं केला नवा विक्रम

ते पुढे म्हणाले, की संपूर्ण देश आज पाकिस्तान धार्जिण्या मुस्लिमांनी पोखरून काढला आहे आणि आम्ही केवळ चर्चा करीत बसलो आहोत. गेली २० वर्षे भारत दहशतवादाविरुद्ध लढत आहे. त्या वेळी अमेरिकेने किंवा ब्रिटनने आपल्याला कधी मदत केली नाही. त्यांच्यावर हल्ला झाला. तेव्हा त्यानी जगातल्या सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री कॉलिन पॉवेल आणि इतर नेते जगभर फिरत आहेत. परंतु ते भारताला कधीच मदत करणार नाहीत, याची जाणीव केंद्र सरकारने ठेवली पाहिजे.

राज्यातील आघाडी सरकारवर टीका करताना ठाकरे म्हणाले, "काहीही काम न करता हे सरकार दोन वर्षे टिकले, याला आम्हीच जबाबदार आहोत. आमचा करंटेपणा नेहमीच आड आला. गेल्या दोन वर्षांत किमान चार-पाच वेळा हे सरकार पडता पडता वाचले. एखादे 'ऑपरेशन' पूर्ण होत आले, तर ऐनवेळी कोणाच्या आणि कसे पोटात दुखेल, हे सांगता येत नाही. पण या दुखण्याचेच परिणाम आज आम्ही भोगत आहोत.

या वेळी शिवसेना नेते प्रमोद नवलकर, दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते नारायण राणे, केंद्रीय मंत्री मनोहर जोशी आदीचीही भाषणे झाली. या वेळी व्यासपीठावर राज ठाकरे व उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते. या मेळाव्यात अपेक्षित उत्साह जाणवत नव्हता.

Balasaheb Thackeray:
Mumbai Local: दसऱ्यासाठी सजली मुंबईची लाइफ लाईन; नटलेल्या लोकल ट्रेनचा VIDEO तुफान व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com