कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते पहिल्यांदाच दिसणार शिवाजीपार्कवर..

कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते पहिल्यांदाच दिसणार शिवाजीपार्कवर..

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा (रविवारी) उद्या स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने त्यांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून लाखो शिवसैनिकांची गर्दी शिवतीर्थावर उसळणार आहे. शिवसेनाप्रमुखांना नमन करण्यासाठी उद्या शिवाजी पार्क इथे शिवसैनिक जमलेले आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान, रविवारी एनडीएने घटकपक्षांची बैठक बोलावलीय. मात्र, या बैठकीला शिवसेनेचे नेते सहभागी होणार नाहीत. कारण सगळे शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावर जमणार आहेत. यावेळी महाशिवआघाडीचे पदाधिकारीही उपस्थित राहणार असल्याचं सागण्यात येतंय.

अशी आहे जय्यत तयारी : 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नमन करण्यासाठी उद्या हजारो नागरिक आणि शिवाजीपार्कवर जमणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी सध्या रंगरंगोटी आणि इतर व्यवस्था केली जातेय.  उद्या या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. पदाधिकारी आणि आमदारांसाठी एक वेगळं गेट असणार आहे. याचबरोबर मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिक देखील या ठिकाणी येणार असल्याने त्यांच्यासाठी दोन वेगळ्या गेट्सची सुविधा करण्यात आली आहे. 

राज्यात महाशिवआघाडी लवकरात लवकर सरकार स्थापन करणार आहे. अशात उद्या शिवसेनेव्यतिरिक्त राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे अनेक मोठे नेते हे शिवाजीपार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस नमन करण्यास येण्याची शक्यता आहे. अशात मोठ्या प्रमाणावर जय्यत तयारी सुरु आहे.  

राज्याचे समीकरण 2019 च्या निवडणुकीनंतर बदललेलं पाहायला मिळतंय. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष भाजपच्या विरोधात एकत्र आले आहेत. त्यामुळे महाशिवआघाडीचे पदाधिकारी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहतील ते ही प्रथमच.  त्यामुळे उद्याच्या  दिवसाला महत्व आहे.

Webtitle : balasaheb thackeray smrutidin many congress and NCP leaders may pay tribute 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com