म्युझियमसमोर उभारणार बाळासाहेबांचा पुतळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयासमोरील (म्युझियम) चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्यास महापालिकेच्या महासभेने मंगळवारी (ता. २१) मंजुरी दिली. हा पुतळा लवकरच उभारला जाईल, असे महापौरांनी सांगितले.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयासमोरील (म्युझियम) चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्यास महापालिकेच्या महासभेने मंगळवारी (ता. २१) मंजुरी दिली. हा पुतळा लवकरच उभारला जाईल, असे महापौरांनी सांगितले.

महत्वाची बातमी ः माहुलमधील 300 कुटुंबियांसाठी सरकारने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा गेटवे ऑफ इंडिया येथील महाराष्ट्र पोलिस मुख्यालयासमोर उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी २०१५ मध्ये गटनेत्यांच्या बैठकीत मांडला. तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी मंजुरी देऊन हा ठराव महापालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला. दरम्यान, निर्धारित जागा अपुरी पडणार असल्याने स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयासमोरील चौकात पुतळा उभारण्याची सूचना केली. त्यानुसार प्रस्ताव बनवण्यात आला. 

विविध विभागांकडून परवानगी मिळताच बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण केले जाईल. त्यासाठी सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि मी पाठपुरावा करत आहे. पुतळा उभारताना त्रुटी शिल्लक राहू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: balasaheb thackeray statue near museum