माहुलमधील 300 कुटुंबियांसाठी सरकारने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

File Photo
File Photo

मुंबई : माहुलमधील प्रदूषणग्रस्त तीनशे कुटुंबांचे म्हाडाच्या इमारतीत लवकरच पुनर्वसन करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. माहुल येथील प्रदूषणग्रस्त भागातील नागरिकांचे पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने मंगळवारी म्हाडा, मुंबई महापालिका आणि पर्यावरण विभागाची संयुक्त बैठक घेण्यात आली. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत हा निर्णय झाल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

पुनर्वसनासाठी सध्या म्हाडाकडे उपलब्ध असलेली 300 घरे पुढील 10 दिवसांत मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करावीत. मुंबई महापालिकेने या 300 घरांमध्ये अतिप्रदूषित भागातील कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करावे, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी या वेळी दिली. उर्वरित घरांचेही पुनर्वसन करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

आदित्य ठाकरे म्हणाले, की विविध उद्योग आणि रासायनिक प्रकल्पांनी वेढलेल्या माहुल भागातील प्रदूषण नियंत्रित करणे आणि अतिप्रदूषित भागातील घरांचे पुनर्वसन करणे हा आमचा प्राधान्याचा विषय आहे.

- आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत लवकरच बैठक 
माहुल येथील वाढत्या प्रदूषणाचा परिणाम हा फक्त त्या भागापुरता मर्यादित न राहता मुंबईतील इतर भागांतही होत आहे. त्यामुळे हे प्रदूषण नियंत्रित करणे काळाची गरज आहे. याअनुषंगाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर लवकरच बैठक घेण्यात येईल. माहुल भागातील उद्योग हे पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने आवश्‍यक निकषांची पूर्तता करतात किंवा नाही याची पडताळणी करणे, उद्योगांकडून सांडपाणी व्यवस्थापन, हरित क्षेत्राची निर्मिती, हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना आदींची अंमलबजावणी करून घेणे आदींबाबत चर्चा करण्यात येईल, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.
This decision is taken by the government for 300 families in Mahul

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com