तब्बल 1300 महिलांच्या तक्रारी, लॉकडाऊनच्या काळ्या पडद्याआड घरगुती हिंसाचार

तब्बल 1300 महिलांच्या तक्रारी, लॉकडाऊनच्या काळ्या पडद्याआड घरगुती हिंसाचार

मुंबई : लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला 1,300 हून अधिक फोन कॉल्स आले आहेत. कोविड-19 या महामारीचा सर्व देशभर आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनने प्रत्येकावर, विशेषत: महिलांवर प्रचंड प्रभाव पाडला आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने (एम एस सी डब्ल्यू) जारी केलेल्या आकडेवारीवरून हे सिद्ध झाले आहे. 

अधिकृत आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की महामारी आणि लॉकडाऊन कालावधीत आयोगाकडे महाराष्ट्रातील महिलांकडून 1300 हून अधिक तक्रारी आल्या आहेत. ज्यात घरगुती अत्याचार वाढल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या. 

यापैकी 30 टक्के तक्रारी घरगुती हिंसाचार आणि त्यानंतर कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ यासंबंधी आहेत, असे एमएससीडब्ल्यूचे सदस्य सचिव आस्था लुथरा यांनी सांगितले. आयोगाच्या अहवालानुसार राज्यात महिलांकडून सुमारे 1308 तक्रारी आल्या. बहुतेक महिलांनी घरगुती हिंसाचारासंदर्भात 397 कॉल) आणि त्यानंतर सामाजिक समस्या 376 कॉल आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाबाबतील 108 कॉल्स आले आहेत. 

या 1,308 तक्रारींपैकी लुथुरा यांच्या म्हणण्यानुसार, आयोगाने 1,263  प्रकरणात व्यथित महिलांना यशस्वीरित्या मदत केली. अशी काही प्रकरणे आहेत ज्यात पोलिसांना तपास करण्याची गरज आहे आणि त्यासाठी वेळ लागतो. कामाची ठिकाणे देखील संबंधित तक्रारी संबंधित विभागीय समित्यांनी पुन्हा हाताळली पाहिजेत. ज्यामुळे आणखी वेळ जातो.  त्यामुळे अशा परिस्थितीत एमएससीडब्ल्यूने संबंधित अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे किंवा त्यासाठी हस्तक्षेप केला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन त्या तक्रारीमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे.

more than 1300 complains of domestic violence against women received amid lockdown 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com