FDA निर्देश, रेमडेसिवीर औषधांचा काळाबाजार होऊ न देण्याचे आवाहन

FDA निर्देश, रेमडेसिवीर औषधांचा काळाबाजार होऊ न देण्याचे आवाहन

मुंबई : रेमडेसिवीर इंजेक्शन हे औषध कोविड रूग्णांसाठी वापरण्यास शासनाची परवानगी आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार गरजुंना हे औषध सहज उपलब्ध व्हावे, यासाठी काटेकोरपणे दक्षता बाळगण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त जे.बी.मंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सध्या महाराष्ट्रात या औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध असून तुटवडा होणार नाही, याबाबत योग्य ते नियंत्रण ठेवले जात असल्याचे ही मंत्री यांनी स्पष्ट केले आहे. या औषधाच्या विक्री, वितरण आणि साठ्यावर व काळ्या बाजारावर अन्न व औषध प्रशासन विभाग नियंत्रण ठेवत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन या औषधाच्या प्राप्त, वापर व शिल्लक साठ्याबाबतची माहिती प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध असून त्यावर प्रशासनातर्फे नियंत्रण ठेवले जात आहे. या औषधाचे वितरण फक्त रूग्णालय आणि संस्था यांनाच करण्यासाठी अनुमती दिलेली आहे.

आजतागायत प्रशासनामार्फत यापूर्वी काही प्रकरणी जप्ती आणि छाप्यांची कारवाई केली असून संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले. शिवाय, आरोपींना पोलीसांमार्फत अटक करण्यात आलेली आहे. प्रशासनामार्फत अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयात 24 तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आलेला आहे.

त्याचा क्रमांक 022-26592364 आहे तसेच टोल फ्री क्रमांक 1800222365 हा उपलब्ध आहे. तरी, रेमडेसिवीर इंजेक्शन कोणत्याही रुग्णास मिळत नसल्यास अथवा औषधाचा काळाबाजार होत असल्यास त्याबाबतची माहिती त्यांनी संबंधित अन्न व औषध प्रशासन जिल्हा कार्यालयास अथवा नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधल्यास औषध मिळूवन देण्यास निश्चित मदत केली जाईल, तसेच काळाबाजार होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही सह आयुक्त मंत्री यांनी सांगितले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

fda instructs to the authority about black marketing of remdesivir injections

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com