खातेवाटपासंदर्भात बाळासाहेब थोराथ यांचा गौप्यस्फोट, म्हणाले..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

येत्या एक-दोन दिवसांत शपथविधी झालेल्या मंत्र्यांचं खातेवाटप होईल, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज मंत्रालयात स्पष्ट केले आहे. 

मुंबई : येत्या एक-दोन दिवसांत शपथविधी झालेल्या मंत्र्यांचं खातेवाटप होईल, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज मंत्रालयात स्पष्ट केले आहे. . 

खातेवाटपाचं काम खेळीमेळीने आणि चर्चा करुन

कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून निर्माण केलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. सरकार स्थापन होऊन एक आठवडा होत आला मात्र अध्यापही खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेण्यात आला नाही. याबाबत थोरात यांना प्रश्न विचारला असता दोन दिवसांत खातेवाटप होईल, असे त्यांनी सांगितले आहे. खातेवाटपाचे काम आम्ही खेळीमेळीने आणि चर्चा करुन करतोय. दोन दिवसात याबाबतचे निर्णय पूर्ण होतील आणि खातेवाटप केले जाईल, असे थोरात म्हणाले.

महत्त्वाची बातमीमहिलांचं WhatsApp स्टेटस पाहणाऱ्यांनो सावधान, पोलिस ठोकतील तुम्हाला बेड्या
 

एकनाथ खडसे यांच्यावर अन्याय झाला

भाजपने कतृत्वान नेत्यांना दूर लोटले असल्याचा आरोप  करत थोरात म्हणालेत  की, एकनाथ खडसे यांच्यावर साहजिकच अन्याय झाला आहे. भाजपमध्ये ज्या नेत्यांमध्ये सक्षम असे नेतृत्व क्षमता होती त्यांना दुर्दैवाने दूर लोटले गेले.त्यामुळे ते सध्या नाराज आहेत. याशिवाय विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, राज पुरोहित यांची कारण नसताना तिकीटे कापली, असेही ते म्हणाले. 

महत्त्वाची बातमी : कांदाप्रश्नावर लवकरच निघणार तोडगा; अमित शाह यांनी बोलावलेली बैठक संपली

भाजपचे 10 ते12 आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार 

भाजपचे आमदार फुटणार अशी चर्चा सुरू आहे. याबाबत थोरात यांना विचारले असता ते म्हणाले की, भाजपमधील 10 ते12 आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षातील मोठमोठ्या आणि दिग्गज नेत्यांनी आपापल्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. भाजपकडून त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली. मात्र, त्यापैकी अनेकांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे त्या सर्व बंडखोर नेत्यांमध्ये सध्या अस्वस्थता निर्माण झाली असल्याचा दावा ही त्यांनी यावेळी केला.  

Webtitle : Balasaheb thorath on mahavikas aaghadis cabinet expansion 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: balasaheb thorath on mahavikas aaghadis cabinet expansion