esakal | बदलापूरात सहाय्यक आयुक्तांवरील हल्ल्याचा निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

badlapur

बदलापूरात सहाय्यक आयुक्तांवरील हल्ल्याचा निषेध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बदलापूर : ठाणे महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर ठाण्यात फेरीवल्याकडून झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बदलापूर नगरपालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तीव्र निषेध नोंदवत आज काम बंद आंदोलन केले.

मुख्याधिकारी योगेश गोडसे यांना अधिकाऱ्यांनी  निवेदन दिले. मुख्याधिकारी गोडसे यांनीही कल्पिता  पिंपळे यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा  तीव्र शब्दात निषेध नोंदवला, शासकीय कर्तव्य बजावणाऱ्यावर हल्ले होणे चुकीचे आहे, अश्या प्रवृत्तींना कोणीही पाठीशी घालू नये असे सांगितले.

हेही वाचा: विराटला खाली ढकलून रोहित शर्मा Top 5मध्ये; जो रूट अव्वलस्थानी

कल्पिता पिंपळे कर्तव्य बजाताना झालेल्या  हल्ल्यात  त्या जबर जखमी झाल्या आहेत, त्यांना पोलीस संरक्षण मिळावे त्याच प्रमाणे  महापालिका आणि नगरपालिकेतील अतिक्रमण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनाही कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते, त्यांनाही पोलीस संरक्षण देण्याची मागणी बदलापूर नगरपालिका अधिकाऱ्यांनी यानिमित्ताने  केली.

loading image
go to top