दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा मोठा निर्णय! वाचा बातमी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 February 2020

मुंबईत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी 9 मार्चपर्यंत जमावबंदी व ड्रोन उडवण्यावर बंदी घातली आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियमांतील (1951) अधिकारानुसार पोलिस उपायुक्तांनी (अभियान) बृहन्मुंबई हद्दीत 9 मार्चपर्यंत जमावबंदी व ड्रोनबंदी लागू करण्याचे आदेश दिले. 

मुंबई : मुंबईत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी 9 मार्चपर्यंत जमावबंदी व ड्रोन उडवण्यावर बंदी घातली आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियमांतील (1951) अधिकारानुसार पोलिस उपायुक्तांनी (अभियान) बृहन्मुंबई हद्दीत 9 मार्चपर्यंत जमावबंदी व ड्रोनबंदी लागू करण्याचे आदेश दिले. 
विवाह समारंभ आणि संबंधित अन्य कार्यक्रम, अंत्यसंस्कार, सहकारी संस्था-कंपन्या-संघटनांच्या वैधानिक बैठका, क्‍लबमधील कार्यक्रम, सहकारी संस्था व अन्य संस्थांच्या नियमित कामकाजाच्या कार्यक्रमांना या बंदीतून वगळण्यात आले आहे. मोर्चा काढणे, पाच किंवा अधिक व्यक्तींनी एका ठिकाणी जमणे, जमाव करून फटाके फोडणे, संगीत आणि बॅंड यांनाही प्रतिबंध करण्यात आला आहे. 

महाराष्ट्राच्या 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तब्ब्ल दोन महिने लांबणीवर.. 

दिल्लीत उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई पोलिसांनी ही उपाययोजना केल्याचे सांगण्यात आले. चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, सरकारी-निमसरकारी कार्यालये, शाळा-महाविद्यालये व अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या-कारखाने, दुकाने व अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार- व्यवसायासाठी होणाऱ्या जमावाला या आदेशातून वगळण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शहरात कोणत्याही प्रकारचे ड्रोन न उडवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 

बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात OBC जनगणना करा - छगन भुजबळ

Ban on mobs in Mumbai till March 9


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ban on mobs in Mumbai till March 9