बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात OBC जनगणना करा - छगन भुजबळ

बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात OBC जनगणना करा - छगन भुजबळ

मुंबई - महाराष्ट्राच्या  विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी अत्यंत महत्त्वाची मागणी केलीये. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील OBC समाजाच्या जनगणनेची मागणी छगन भुजबळ यांनी केलीये. दरम्यान OBC समाजाची वेगळी जनागना करण्याच्या मागणी रास्त असल्याचं विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणालेत. 

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात OBC समाज आहे. आता येऊ घातलेल्या जनगणनेतच या संदर्भात एक रकाना वाढवून OBC जनगणना करण्यात यावी. येऊ घातलेल्या जनगणनेत भरण्यात येणाऱ्या फॉर्ममध्ये अनेक रकाने आहेत. यामध्येच एक रकाना वाढवून OBC जनगणना व्हायला हवी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते यांनी एकत्रित येत दिल्ली दरबारी याची मागणी केली पाहिजे, असं देखील छगन भुजबळ म्हणालेत. 

छगन भुजबळ यांनी मांडलेला विषय महत्त्वाचा आहे. इतर मागास वर्गासाठी योजना आखायच्या असतील, विविध कार्यक्रम राबवायचे असतील तर त्या संदर्भातील OBC जनगणना होणं महत्त्वाचं आहे. मागच्या काळात गोपीनाथ मुंडे यांनी देखील याबाबत मागणी केली होती. आमचं याला समर्थन आहे. सदर निर्णय धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील महत्त्वाच्या नेत्यांनी मिळून केंद्राकडे याबाबत लक्ष वेधलं पाहिजे. जनागना करणारी स्वायत्त संस्था असल्यामुळे थेट केंद्राला देखील यामध्ये बदल करता येत नाहीत. मात्र या बाबत केंद्राशी संपर्क साधून, केंद्राने यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी करायला हवी असं फडणवीस म्हणालेत.

दरम्यान केंद्राकडून याबाबत पावलं उचलली गेली नाहीत तर महाराष्ट्राने स्वतः याबाबत पावलं उचलावीत आणि महाराष्ट्र सरकारमार्फत OBC जनगणना करण्यात यावी असं गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणालेत.  

chagan bhujbal raises demands to count obc population under census 2021

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com