
ठाणे : निसर्गरम्य ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अनेक पावसाळी धबधबे आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हे धबधबे वाहायला लागले असून पर्यटकांना खुणावू लागले आहेत. मात्र नागरिकांसाठी वनविभागातील हे धबधबे धोकादायक असतानाच काही मद्यधुंद अवस्थेतील तरुणांकडून वनसंपत्तीचे आणि प्राण्यांना नुकसान पोहोचविण्याचे कृत्य घडते.