Mumbai Accident: फोनवर बोलत गाडी सुसाट, रस्ता ओलांडणाऱ्या ८ वर्षांच्या मुलाला लक्झरी कारनं चिरडलं; महिला फिटनेस कोचला अटक

Mumbai Bandra Accident: मोबाईलवर बोलत असताना महिला चालकाने रस्ता ओलांडणाऱ्या ८ वर्षांच्या मुलाला लक्झरी कारनं चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Bandra Accident

Bandra Accident

ESakal

Updated on

मुंबई : कार चालवताना मोबाईलवर बोलत असताना, चालकाचे लक्ष विचलित झाल्याने रस्ता ओलांडणाऱ्या आठवर्षीय मुलाला जोरदार धडक बसली. वांद्रे पश्चिमेकडील बाप्टिस्ट मार्गावर रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेत अंश गुप्ता नामक मुलाचा मृत्यू झाला. कारचालक मेघा रावल (वय ४५) यांना वांद्रे पोलिसांनी अटक केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com