काँग्रेस आमदार झीशान सिद्दीकी
काँग्रेस आमदार झीशान सिद्दीकी

मविआ सरकारमधील काँग्रेस आमदाराचा शिवसेनेवर संताप

वादाला ही गोष्ट कारण ठरली

मुंबई: लसीकरण केंद्राच्या उदघाटनाचे निमंत्रण न मिळाल्याने काँग्रेसच्या आमदाराने (Congress mla) शिवसेनेला (shivsena) उपदेशाचे डोस दिलेत. शिवसेना उमेदवाराचा पराभव करुन विजयी झाल्याबद्दल विभागात होणाऱ्या सर्व सरकारी कामांपासून दुर ठेवले जाते असा आरोपच काँग्रेसने केला आहे. वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील लसीकरण केंद्राचे उदघाटन गुरुवारी झाले. मात्र, या उदघाटनाला काँग्रेसचे स्थानिक आमदार झिशान सिध्दीकी (zeeshan siddiqui) यांना निमंत्रण दिले नसल्याचा दावा त्यांनी केला. (bandra Congress mla zeeshan siddiqui upset with shivsena)

त्यावरुन आज ट्वीटरवर व्हिडीओ व्हायरल करत त्यांनी शिवसेनेवर थेट हल्ला चढवला आहे. शिवसेनेचे माजी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांचा पराभव करुन आपण विजयी झालो आहोत. त्यामुळेच या मतदार संघात होणाऱ्या कार्यक्रमांचे निमंत्रण दिले जात नाही. ही पहिलीच वेळ नसून अनेक वेळा असे प्रकार झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेस आमदार झीशान सिद्दीकी
महाराष्ट्रात १ मार्च ते ४ एप्रिलमध्ये ६० हजारपेक्षा जास्त मुले कोरोनाबाधित

मतदार संघात काम करताना अनेक अडथळे आणले जाते. पालिकेशी संबंधीत कामे असल्यास कामांना परवानगी मिळत नाही, असा आरोपही त्यांनी केला. आपण लसीकरणातही राजकरण करत आहोत का असा थेट सवालही त्यांनी केला आहे. केवळ फोटोसाठी केलेल्या कामा पेक्षा जनतेसाठी केलेल्या कामाला अधिक मोल असते असा टोलाही त्यांनी लगावला आहे.या केंद्राचे उदघाटन परीवहन मंत्री ॲड.अनिल परब यांच्या हस्ते झाले आहे.तर,सिध्दीकी यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये ॲड.परब यांना टॅग केले आहे.

काँग्रेस आमदार झीशान सिद्दीकी
मुंबईत अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ५० हजारच्या आत...

मुख्यमंत्र्यांना तक्रार करणार

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आपले चांगले मित्र आहेत. त्यांनाही काही गोष्टी सांगितल्या आहेत.या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना तक्रार करणार आहे. असेही त्यांनी या व्हिडीओ मध्ये नमुद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com