Encroachment Action
esakal
मुंबई : वांद्रे येथील गरीबनगर परिसरात पश्चिम रेल्वेने नुकतीच अतिक्रमणविरोधी कारवाई केली. यानंतर विस्थापित झालेल्या नागरिकांचे आता मुंबईतील अन्य भागांमध्ये स्थलांतर सुरू झाले आहे. या विस्थापितांमध्ये काही अनधिकृत बांगलादेशी नागरिकांचाही समावेश असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. त्यांच्याकडून मुंबईत अन्यत्र रेल्वे रुळांलगत पुन्हा अतिक्रमण होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.