

Massive Clearance: 400+ Illegal Structures Demolished in Bandra East
Sakal
मुंबई : वांद्रे पूर्वेतील गरीब नगर परिसरात पश्चिम रेल्वेकडून राबविण्यात आलेली विशेष अतिक्रमण हटाव मोहीम शनिवारी पाचव्या दिवशी पूर्ण झाली. सलग पाच दिवस चाललेल्या या मोठ्या कारवाईत परिसरातील शेकडो अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालविण्यात आला. शेवटच्या दिवशीही प्रशासनाने संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवत सुरक्षा व्यवस्था, साफसफाई आणि रेल्वे जागेच्या संरक्षणाची कामे सुरू ठेवली.