आता 'बीकेसी'तही काळा घोडाच्या धर्तीवर महोत्सव होणार; वाचा नक्की कोणत्या ठिकाणी भरणार हा महोत्सव

संजय घारपुरे
Thursday, 20 August 2020

मुंबईतील व्यापार केंद्र म्हणून ओळखल्या जात असलेल्या वांद्रे कुर्ला संकुलात आर्ट डिस्ट्रीक्ट प्लाझा सुरु होण्याची शक्यता आहे. तिथे दक्षिण मुंबईतील काळा घोडा महोत्सवाच्या धर्तीवर महोत्सव घेण्याचा विचार होत आहे. 

मुंबई ः मुंबईतील व्यापार केंद्र म्हणून ओळखल्या जात असलेल्या वांद्रे कुर्ला संकुलात आर्ट डिस्ट्रीक्ट प्लाझा सुरु होण्याची शक्यता आहे. तिथे दक्षिण मुंबईतील काळा घोडा महोत्सवाच्या धर्तीवर महोत्सव घेण्याचा विचार होत आहे. 

गेल्या वर्षीही तेच झालं होतं, यंदाही तेच ! स्वीटी खेळताना घराबाहेर गेली आणि आई वडिलांना मिळाला मृतदेह

मुंबई महानगर विभागीय विकास प्राधीकरण यांच्यावर वांद्रे कुर्ला संकुलातील नियोजनाची जबाबदारी आहे. त्यांनी कलानगर उड्डाणखालील जागा या प्लाझासाठी निश्चित केली असल्याचे वृत्त आहे. हा प्लाझा कलानगर जंक्शन ते नंदादीप गार्डन या भागात असण्याची शक्यता आहे, त्यामुळे तिथे सहज फिरता येईल असा विचार करण्यात आला आहे. 

संकल्पीत प्लाझामध्ये अॅम्पीथिएटर, बसण्याची जागा, स्टेज, कॅफेटरिया, ग्रीन स्पेस, आर्ट इस्टॉलेशन्स आणि पार्किगंसाठी जागा असेल. या ठिकाणी कला महोत्सव नियमीतपणे आयोजित करण्याचा विचार आहे. त्यामुळे कलाकारांना आपली कला दाखवण्याची एक संधी मिळेल तसेच उत्पन्नाचे चांगले साधनही होईल. आर्ट प्लाझामुळे जमिनीच्या किंमतीसही जास्त भाव येईल. 

गुगलची नोकरी सोडून सुरु केलं स्वतःचं किचन, आता मिळतंय ५० लाखांचं उत्पन्न...

वांद्रे कुर्ला संकुलातील पहिला महोत्सव यंदाच्या डिसेंबरमध्ये घेण्याची योजना होती, पण आता ती लांबणीवर पडली आहे. मात्र 8 हजार 343 चौरस मीटर जागेचा पुरेपूर उपयोग करण्याचा विचार होत आहे. महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतेच कलानगर येथील आर्ट इन्स्टॉलेशनचे उद््घाटन केले होते. त्यावेळी त्यांनीच ट्वीट करताना बीकेसी आर्ट डिस्ट्रीक्ट लवकरच खुला होईल असे सांगितले होते..

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bandra kurla complex to get art district plaza fest on lines of kala ghoda