सुशांत सिंग आत्महत्याप्रकरणी नजीकच्या व्यक्तीचा नोंदवला जबाब...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020


पोलिसांनी मंगळवारी सुशांतचे वडील व दोन बहिणी, कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा, नोकर अशा 10 जणांचा जबाब नोंदवला.  याप्रकरणी पोलिसांनी सुशांतच्या घरातून पाच डायऱ्याही हस्तगत केल्या असून त्यांची तपासणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई : सुशांत सिंग राजपुत आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. सुरुवातीला काही जणांचे जबाब नोंदवल्यानंतर आज पुन्हा या प्रकरणी तपास करण्यात आला. तसेच पोलिसांनी सुशांतच्या घरातून काही वस्तूही जप्त केल्या.

क्या बात..! 92 वर्षीय आजीबाईंनी केली कोरोनावर मात...

पोलिसांनी मंगळवारी सुशांतचे वडील व दोन बहिणी, कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा, नोकर अशा 10 जणांचा जबाब नोंदवला.  याप्रकरणी पोलिसांनी सुशांतच्या घरातून पाच डायऱ्याही हस्तगत केल्या असून त्यांची तपासणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पालिकेच्या हेल्पलाईनवर वाढले 'चिंतेचे कॉल'! कोव्हिड महामारीमुळे भीतीमध्ये भर

रविवारी (ता.14) सुशांत सकाळी साडेसहा वाजता उठला. 9 वाजता त्याने ज्यूस पिऊन साडेनऊच्या सुमारास बहिणीला दूरध्वनी केला होता. साडे दहाच्या सुमारास  सुशांत पुन्हा त्याच्या खोलीत गेला तो बाहेर आलाच नाही. 11 च्या सुमारास त्याच्या नोकराने त्याला जेवणासाठी विचारले. मात्र त्याच्या खोलीतून कोणतेही प्रतिउत्तर आले नाही. 12 वाजले तरी सुशांत रुमबाहेर न आल्याने नोकर त्याला पुन्हा उठवायला गेला. मात्र तरी सुशांत खोलीतून कोणताही प्रतिसाद देत नसल्यामुळे नोकराने सुशांतसोबत राहणारा त्याचा मित्र सिद्धार्थ याला सांगितले. 

मुंबई पूर्व उपनगरामध्ये नागरिक सहन करतायेत 'हा' नाहक त्रास...

सिद्धार्थ हा आर्टीस्ट आहे. त्याने सुशांतला फोन केले; मात्र सुशांत फोन ही घेत नव्हता. मग सिद्धार्थने त्याच्या गोरेगाव येथे राहणाऱ्या बहिणीला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्याने चावीवाल्याला बोलावले. चावीवाल्याने बनावट चावीने दरवाजा उघडल्यानंतर सुशांतने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात सुशांतची बहिण, 2 मॅनेजर, स्वयंपाकी, चावीवाला आणि त्याचा जवळचा मित्र महेश शेट्टी याच्याशी बोलून पोलिसांनी सर्व घटनाक्रम समजावून घेतला आहे. याशिवाय सुशांतच्या वडिलांनीही मानसिक तणावाचे कारण सुशांतने सांगितले नसल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

माहिम रेल्वेस्थानकावर कोरोना वॉरिअर्सना अनोखी मानवंदना

या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुरुवारी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीचा जबाब नोंदवला. दरम्यान पोलिसांनी सुशांतच्या घरातून पाच डायऱ्या ताब्यात घेतल्या असून त्याची तपासणी करण्यात येणार आहे. सुशांत सिंगप्रकरणी पोलिसांनी बुधवारी कास्टींग डायरेक्टरचा जबाब नोंदवला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bandra police took statement on sushant singh rajput incident