वांद्य्रातील झोपडपट्टीला भीषण आग

मुंबई - बांद्रयातील (प) नर्सिग दत्त झोपडपट्टीला मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. पाण्याचा फवारा सोडून आग विझविण्यासाठी प्रयत्न करताना अग्निशामक दल व आप्तकालिन दलाचे कर्मचारी.
मुंबई - बांद्रयातील (प) नर्सिग दत्त झोपडपट्टीला मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. पाण्याचा फवारा सोडून आग विझविण्यासाठी प्रयत्न करताना अग्निशामक दल व आप्तकालिन दलाचे कर्मचारी.

मुंबई - वांद्रे येथील नर्गीस दत्तनगरमधील लालमाती परिसरातील झोपडपट्टीला मंगळवारी भीषण आग लागली. आगीत 80 झोपड्या खाक झाल्या; तर दोन मुलांसह दोन महिला जखमी झाल्या आहेत.

बंद घरातील सिलिंडर स्फोटामुळे ही आग लागल्याचे समजते. त्यानंतर इतर घरांतही सात सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग आणखी भडकली.

त्यानंतर आगीबरोबरच धुराचे लोटच्या लोट उसळले. या परिसरात दाटीवाटीने दोन ते तीन मजली झोपड्या असल्यामुळे अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणण्यात अडथळा येत होता. अखेर सायंकाळी पाच वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. 2004 पासून या ठिकाणी सात ते आठ वेळा आग लागली आहे. दीड वर्षातील ही आगीची तिसरी घटना आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com