कोचर यांच्याविरोधात बॅंक न्यायालयात

File Photo
File Photo

मुंबई : आयसीआयसीआय बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर यांची पदावरील नियुक्ती रद्द करण्यावर शिक्‍कामोर्तब करण्याच्या मागणीसाठी बॅंकेच्या वतीने न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडील आर्थिक भत्त्यांचा परतावा मिळण्याची मागणीही यामध्ये करण्यात आली आहे.

कोचर यांना बॅंकेच्या वतीने चालू वर्षी जानेवारीमध्ये पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच त्यांचे सन 2009 ते 2018 या कालावधीतील आर्थिक भत्तेही रोखून ठेवण्यात आले आहेत. याविरोधात कोचर यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. सोमवारी या याचिकेवर न्या. रणजीत मोरे आणि न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 

बॅंकेच्या वतीने आज न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. बॅंकेच्या नियमांनुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याला गैरप्रकार किंवा आर्थिक नफ्यात तूट केल्याच्या कारणावरून काढून टाकण्यात आले असेल, तर त्याला त्यापूर्वी दिलेली आर्थिक भत्त्यांची (बोनस, विशेष भत्ता इ.) रक्‍कम बॅंक पुन्हा परत घेऊ शकते. कोचर यांनी व्हिडीओकॉन कंपनीला दिलेल्या हजारो कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणामध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. याचा ठपका ठेवून त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे, तसेच त्यांच्याविरोधात गुन्हाही नोंदवण्यात आलेला आहे.

कोचर यांच्याकडून खंडण 
कोचर यांनी बॅंकेबरोबर डिसेंबर 2016 मध्ये संबंधित नियमांबाबत करारपत्र केलेले आहे. त्यामुळे आता बॅंक व्यवस्थापनाकडून त्यांना दिलेली रक्कम परत घेता येऊ शकते, असे बॅंकेचे म्हणणे आहे. या प्रतिज्ञापत्रावर बाजू मांडण्याचे निर्देश खंडपीठाने कोचर यांना दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी ता. 20 रोजी होणार आहे. कोचर यांनी बॅंकेचा निर्णय मनमानी असून त्याला कायदेशीर आधार नसल्याचा आरोप याचिकेत केला आहे. ईडीनेही आता कोचर यांच्याविरोधात मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केली आहे.

Bank in court against Chanda Kochar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com