बॅंक कर्मचाऱ्याला एक लाखाचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

मुंबई - सर्वसामान्य खातेदारांना फसवणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी बॅंक कर्मचारी महिलेला क्रेडिट कार्ड व्हेरिफिकेशनच्या नावाखाली ओटीपी नंबर विचारून एक लाखाचा गंडा घातला आहे. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

माटुंग्याच्या हिंदू कॉलनी परिसरात प्रभा नारायण (नाव बदले आहे) कुटुंबीयांसोबत राहतात. त्या प्रभादेवी परिसरातील एका नामांकित बॅंकेत कामाला आहेत. त्यांचे एका राष्ट्रीयीकृत बॅंकेत खाते आहे. 29 जून रोजी प्रभा नारायण यांच्या मोबाईलवर दुपारी 1 वाजता अनोळखी नंबरहून कॉल आला. समोरील व्यक्तीने त्यांना आपण बॅंकेच्या मुख्य कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. कार्डाच्या पडताळणीसाठी फोन केला असल्याचे सांगून ते न केल्यास कार्ड बंद होईल, अशी बतावणी त्याने केली. त्या भीतीने प्रभा यांनी त्या व्यक्तीला कार्डाचा क्रमांक दिला. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांकही दिला. रात्री प्रभा यांच्या मोबाईलवर बॅंकेचे एकामागोमाग एक पाच "एसएमएस' आले. त्यांच्या खात्यातून एक लाख पाच हजार रुपये काढण्यात आले होते.

Web Title: bank employee cyber crime one lakh cheating