बॅंकेतून 40 हजार लंपास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

नवी मुंबई - 786 क्रमांकाची नोट शोधण्याच्या बहाण्याने खारघरमधील अभ्युदय बॅंकेच्या रोखपालाकडून दोन हजारांच्या नोटांचे बंडल घेऊन त्यातील 20 नोटा लंपास केल्याप्रकरणी पोलिस भामट्याचा शोध घेत आहेत.

नवी मुंबई - 786 क्रमांकाची नोट शोधण्याच्या बहाण्याने खारघरमधील अभ्युदय बॅंकेच्या रोखपालाकडून दोन हजारांच्या नोटांचे बंडल घेऊन त्यातील 20 नोटा लंपास केल्याप्रकरणी पोलिस भामट्याचा शोध घेत आहेत.

अभ्युदय बॅंकेच्या खारघर सेक्‍टर-12 मधील शाखेत हा प्रकार घडला. 40 हजार रुपये मूल्याच्या 20 नोटा चोरल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खारघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 मे रोजी रोखपाल अश्विनी तनपुरे यांच्याकडे आलेल्या एका व्यक्तीने त्यांना 786 क्रमांकाची दोन हजार रुपयांची नोट पाहिजे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून दोन हजाराच्या नोटांचे बंडल घेऊन या भामट्याने त्यांना बोलण्यात गुंतवून 20 नोटा काढून घेतल्या. उर्वरित नोटा तनपुरे यांना परत करून त्याने पोबारा केला. काही वेळाने तनपुरे यांनी नोटांची तपासणी केली असता, हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.

Web Title: bank loot crime