esakal | बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचाऱ्यांनी केला अर्थमंत्रांवर ट्विटरवार
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचाऱ्यांनी केला अर्थमंत्रांवर ट्विटरवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कर्मचारी भरती, आवश्यक सोयीसुविधा आदी मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रमधील (Bank Of maharashtra) कर्मचाऱ्यांनी आपल्या दीर्घकालीन आंदोलनाचा एक भाग म्हणून आज केंद्रीय अर्थमंत्र्यांवर (finance ministers) ट्विटचा भडीमार केला.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असून नवी भरतीही केली जात नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने लोकोपयोगी योजना राबविण्यात अडळले आहेत. त्या कर्मचाऱ्यांसह ग्राहकांनाही त्रास होत आहे. या समस्येकडे केंद्रीय अर्थमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांतर्फे विविध मार्गांचा अवलंब करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सर्व कर्मचाऱ्यांनी बँकेचे एमडी, केंद्रीय अर्थखात्यातील बँकिंग विभागाचे सचिव, केंद्रीय अर्थमंत्री यांना ट्विट पाठवून या समस्या सोडविण्याचे आवाहन केले.

हेही वाचा: ब्रेकिंग! सोलापूर शहरातील सम-विषमचा नियम रद्द 

यानंतर येत्या बुधवारी कर्मचारी संघटनांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात पुण्यातील बँकेच्या मुख्यालयासमोर धरणे धरण्यात येईल; तर पुढील सोमवारी ( ता. २७ ) एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येईल. दरम्यान, महाबँकेतील दोनही अधिकारी संघटना तसेच शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब वेल्फेअर असोसिएशनच्या वतीनेदेखील या संपाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

loading image
go to top