esakal | निषेध!  निषेध !! निषेध !!! "झुठा है तेरा वादा" ; ठाण्यात पुन्हा बॅनरवॉर
sakal

बोलून बातमी शोधा

निषेध!  निषेध !! निषेध !!! "झुठा है तेरा वादा" ; ठाण्यात पुन्हा बॅनरवॉर

अजब तुझे सरकार, गजब तुझा कारभार, निषेध!  निषेध! निषेध! लिहून "झुठा है तेरा वादा" असं या बॅनरवर नमूद करण्यात आलंय. 

निषेध!  निषेध !! निषेध !!! "झुठा है तेरा वादा" ; ठाण्यात पुन्हा बॅनरवॉर

sakal_logo
By
सुमित बागुल

ठाणे : ठाण्यात शिवसेना विरुद्ध भाजप बॅनरवॉर संपण्याचं नाव नाहीये. नुकतंच ठाण्यात भाजपकडून आणखी एक नवीन बॅनर लावण्यात आलंय या माध्यमातून शिवसेनेचा जाहीर निषेध करण्यात आलाय. नागरिकांवर जिझिया कर लढणारी एकमेव महापालिका असाही उल्लेख यामाध्यमातून भाजपकडून करण्यात आलाय.

पाचशे चौरस फुटांच्या घरांचा कर माफ केलेला नाही. वारेमाप पाणी बिलातून नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणले. जबरदस्त झटका देणारी विजेची बिलं पाठवलीत. तर पाण्याचा दर चौरस फुटांवरून ठरवून जिझिया कर लादणारी एकमेव महापालिका असा उल्लेखही या बॅनरवर करण्यात आलाय. अजब तुझे सरकार, गजब तुझा कारभार, निषेध!  निषेध! निषेध! लिहून "झुठा है तेरा वादा" असं या बॅनरवर नमूद करण्यात आलंय. 

महत्त्वाची बातमी : भायखळा आणि मुंबई सेंट्रलमध्ये ४४ टक्के नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडी

ठाणे महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. गेल्या काही दिवसात ठाण्यात बॅनरवरून जोरदार राजकारण रंगताना पाहायला मिळतंय. ठाण्यात कशा प्रकारे सोई सुविधा देण्यात आल्यात. ठाणेकरांना काय काय दिलं गेलं. याबाबत सत्ताधारी पक्षानेच बॅनर लावले होते. त्यानंतर ठाण्यात विरोधकांकडून शिवसेला उत्तर देण्यात आलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाचशे चौरस फुटांच्या घरांवरील मालमत्ता कर रद्द करण्यासाठी आंदोलनही केलं. याचवेळी "क्या हुवा देरा वादा" म्हणत शिवसेनेला पाचशे चुरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची आठवण भाजपच्या  बॅनरमधून करण्यात आलेली होती. आता पुन्हा तोच मुद्दे पकडून भाजपने पुन्हा एकदा "झुठा है तेरा वादा" म्हणत बॅनर लावलाय. भाजपचे नेते संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांची या बॅनरवर नावं आहेत. 

महत्त्वाची बातमी : नवी मुंबईत रेकॉर्ड ब्रेक पाऊस; अवघ्या सात तासांत 210 mm पावसाची नोंद 
दम्यान, आता भारतीय जनता पक्षाकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर शिवसेना कशी प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्त्वाचं आहे. खरंतर महापालिकेची आर्थिक परिस्थितीत कारमाफीऐवढी चांगली नसल्याचं शिवसेनेने स्पष्ट केलेलं आहे. 

banner fights between shivsena and bjp over property tax in thane city