भायखळा आणि मुंबई सेंट्रलमध्ये ४४ टक्के नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडी

सुमित बागुल
Wednesday, 23 September 2020

गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत कमी होणारा कोरोना रुग्णांचा आकडा सप्टेंबर महिन्यात पुन्हा वाढताना दिसतोय.

मुंबई : मुंबईत गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत कमी होणारा कोरोना रुग्णांचा आकडा सप्टेंबर महिन्यात पुन्हा वाढताना दिसतोय. अशातही महत्त्वाची  गोष्ट म्हणजे आता वाढणारा कोरोनाचा आकडा हा बिल्डिंगमधील रुग्णांचा असल्याचं समजतंय. मुंबईत नुकतंच सेरो सर्व्हेक्षण करण्यात आलं. त्यानुसार मुंबईतील साकीनाका, भायखळा त्याचसोबत मुंबई उपनगरांमधील मुलुंड, बोरिवली या भागातील नागरिकांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात कोरोना अँटीबॉडी आढळल्याचे दिसतंय. मुलुंड साकीनाका आणि बोरिवली भागात ३८ ते ३९ टक्के सेरो पॉझिटिव्हीटी आढळून आली आहे.

कोणत्या शहरांमध्ये किती सेरो पॉझिटिव्हिटी  ( सरकारी आकडेवारीनुसार )

  • ठाणे  - ३५ टक्के 
  • मुंबई  - ३० टक्के 
  • दिल्ली  - २७ टक्के,
  • चेन्नई  -२६ टक्के 
  • कोलकाता  - २० टक्के 

महत्त्वाची बातमी नवी मुंबईत रेकॉर्ड ब्रेक पाऊस; अवघ्या सात तासांत 210 mm पावसाची नोंद 

मुंबईत  पाहिलं सेरो सर्व्हेक्षण करण्यात आलेलं तेंव्हा मुंबईतील झोपडपट्टी भागात तब्बल ५७ टक्के नागरिकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडी आढळून आल्या होत्या. त्यानंतर आता आणखी महत्त्वाची बाब समोर येतेय ती मेट्रोपोलीस लॅबच्या माध्यमातून. या लॅबमधील डाटानुसार भायखळा आणि मुंबई सेंट्रलमध्ये ४४ टक्के नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडी आढळून आल्या आहेत. देशभरातील विविध मेट्रोपोलीसच्या लॅबमध्ये आतापर्यंत तब्बल ४० हजार रुग्णांच्या डाटाचे विश्लेषण करण्यात आले. एका इंग्रजी माध्यम समूहाने याबाबत माहिती दिली आहे.

mumbai thane have highest number of antibodies in the citizens 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai thane have highest number of antibodies in the citizens