
डोंबिवली : महाराष्ट्र शासनाने मद्यावरील मूल्यवर्धित कर (व्हॅट), उत्पादन शुल्क आणि परवाना शुल्कात केलेल्या वाढीच्या निषेधार्थ सोमवारी हॉटेल्स ओनर्स असोसिएशन डोंबिवली यांच्या वतीने एक दिवसीय संप पुकारण्यात आला. या संपात कल्याण डोंबिवली मधील सुमारे 500 च्या आसपास हॉटेल्स आणि बार चालक आणि परमिट रुम चालक सहभागी झाले होते. यासंबंधी हॉटेल्स व्यावसायिकांनी सोमवारी एक बैठक आयोजित केली होती. सरकारने हा वाढीव कर रद्द करावा, अशी आमची मागणी असून त्याविषयी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले जाणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अजित शेट्टी यांनी सांगितले.