ठाणे जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, बारवी धरण 100 टक्के भरले

ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे बारवी धरण गुरुवारी 100 टक्के भरले असून ठाणे जिल्ह्याचे वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
Baravi Dam Overflow
Baravi Dam OverflowSakal
Summary

ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे बारवी धरण गुरुवारी 100 टक्के भरले असून ठाणे जिल्ह्याचे वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

डोंबिवली - ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे बारवी धरण गुरुवारी 100 टक्के भरले असून ठाणे जिल्ह्याचे वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. गेल्या दोन तीन दिवसांत बारवी धरण व पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला असून धरणातील पाणीसाठ्यात 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 11 ऑगस्टला सकाळी बारवी धरणात 334.19 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 98.63 टक्के पाणीसाठा होता. सायंकाळच्या सुमारास हे धरण 100 टक्के क्षमतेने भरले असल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली होती. धरण परिसरात शून्य मिमी पावसाची नोंद होत होती. यामुळे बारवी पूर्णक्षमतेने भरण्यास विलंब होण्याची चर्चा सुरू होती. मात्र गेल्या पाच दिवसांपासून धरण व पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली असून धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

30 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत धरणातील पाणीसाठा हा 86 टक्क्यांवर स्थिरावला होता. धरण परिसरात 00 मिमी पावसाची नोंद त्या दरम्यान झाली होती. 7 तारखेपासून धरण परिसरात पावसाचा जोर वाढला. चांगला पाऊस पडल्याने 9 तारखेला पाणीसाठा हा 91 टक्क्यांवर पोहोचला. दोन दिवसांत धरण परिसरात सरासरी अनुक्रमे 87 व 52 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे पाणीसाठा हा आजच्या घडीला 98.63 टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाचा जोर गुरुवारी देखील कायम असल्याने सायंकाळच्या सुमारास बारवी धरण पूर्णक्षमतेने भरले.

बारवी धरणावर स्वयंचलित दरवाजे असून धरण पूर्णक्षमतेने भरल्याने पाण्याचा साठा वाढल्यानंतर धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी आपोआप उघडले जातील. यामुळे धरण परिसर, नदी काठची गावे व अंबरनाथ तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com