P305 बार्ज दुर्घटना: अखेर कॅप्टनविरोधात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

P305 बार्ज दुर्घटना: अखेर कॅप्टनविरोधात गुन्हा दाखल

आतापर्यंत ५१ मृतदेह बाहेर काढण्यात यश; अनेक जण बेपत्ता

P305 बार्ज दुर्घटना: अखेर कॅप्टनविरोधात गुन्हा दाखल

मुंबई: तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात अनेक संसार उद्धवस्त झाले. काहींना आपले आपले प्राण गमवावे लागले. त्यातच, बॉम्बे हायवरील तेल उत्खनन करणाऱ्या P305 हे बार्ज चक्रीवादळात बुडाले. या बार्जवरील आत्तापर्यंत एकूण 51 जणांचे मृतदेह सापडले असून 27 जण अद्याप बेपत्ता असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले. या दुर्घटने प्रकरणी मुंबई पोलिसांकडून P305 बार्जवरील कॅप्टन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेले दोन दिवस या प्रकरणावरून राजकारण तापलं होतं. वादळाची पूर्वकल्पना असतानाही ONGC चे P305 बार्ज समुद्रात कसं गेलं? असे सवाल उपस्थित केले जात होते. पण अखेर या प्रकरणी कॅप्टनवर गुन्हा दाखल झाला आहे. (Barge P305 tragedy Police registered FIR against captain of the ship for negligence)

हेही वाचा: "एवढं मोठं वादळ येणार माहीत असूनही असं घडणं दुर्दैवी"

कॅप्टन राकेश बल्लाव आणि इतर काही जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 304 (2), 338, 34 भादंवि कलमाअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणी यलोगेट पोलिसांनी P305 तराफ्यावरील वाचलेल्या कर्मचाऱ्यांकडून या प्रकरणाची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. चक्रीवादळाची पूर्वसूचना मिळाल्यापासून बार्ज बुडेपर्यंतचा घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. नौदलामुळे सुरक्षितरित्या बचावलेले शेख सध्या ताडदेव अपोलो रुग्णालयात उपचार घेत आहेत. तौक्ते चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केल्याने बॉम्बे हायजवळील तेल विहिरींवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी तयार केलेला P305 हा तराफा समुद्रात बुडाला. या तराफ्यावरील 26 कर्मचा-यांचे मृतदेह बुधवारी रात्रीपर्यंत मिळाले होते. आणखी 23 कर्मचा-यांचे मृतदेह गुरुवारी सायंकाळपर्यंत सापडले. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 49 झाला आहे. अद्यापही 26 कर्मचा-यांचा शोध लागू शकलेला नाही. पी 305 या तराफावर एकूण 261 कर्मचारी होते. दरम्यान नौदलाची शोधमोहिम अद्यापही सुरू आहे. INS कोलकाता ही युद्धनौका बुधवारी रात्री उशिरा बचावलेले कर्मचारी आणि मृतदेह घेऊन मुंबईच्या किनाऱ्यावर आली होती.

हेही वाचा: मुंबईतील 45+ नागरिकांच्या लसीकरणाबद्दल महत्त्वाची बातमी

INS बियास ही युद्धनौका आणखी काही मृतदेह घेऊन गुरुवारी मुंबईत परतली. या तराफ्याशिवाय वरप्रदा या नौकेलाही जलसमाधी मिळाली. त्यावरील 2 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात नौदलाला यश आले असून उर्वरित 11 कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत. समुद्रात तौत्के चक्रीवादळ येणार आहे, याची पूर्वकल्पना असतानाही तराफा P305 च्या कॅप्टनने बंदरावर परत न जाता समुद्रातच राहण्याचा चुकीचा निर्णय घेतला, अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे. ONGC च्या तेल उत्खनन प्रकल्पावर काम करण्याचे कंत्राट अ‍ॅफकॉन कंपनीकडे होते. याच अ‍ॅफकॉन कंपनीने नियुक्त केलेले 261 कर्मचारी तराफा P305 वर होते.

loading image
go to top