"एवढं मोठं वादळ येणार माहीत असूनही असं घडणं दुर्दैवी" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

barge-lost

बार्ज P305 वरील आतापर्यंत सुमारे 50 मृतदेह सापडल्याची असलम शेख यांची माहिती

"एवढं मोठं वादळ येणार माहीत असूनही असं घडणं दुर्दैवी"

मुंबई: तौक्ते चक्रीवादळाच्या (Cyclone Tauktae) तडाख्यात सापडून अरबी समुद्रात (Arabian Sea) एक बार्ज बुडाली. या बुडालेल्या जहाजावरील अनेक कर्मचारी बेपत्ता आहेत. नौदलाकडून अद्यापही या कर्मचाऱ्यांची शोधमोहीम सुरु आहे. ONGC चे P305 हे बार्ज सोमवारी अरबी समुद्रात बुडाले. आतापर्यंत सुमारे ५० मृतदेह (Dead Bodies) सापडले आहेत तर काही कर्मचारी बेपत्ता (Missing) आहेत. त्यामुळे तौक्ते चक्रीवादळाचा इशारा दिलेला असतानाही हे बार्ज समुद्रात का गेले? त्याची चौकशी मुंबई पोलिस (Mumbai Police) करणार आहेत. याच मुद्द्यावर राज्याचे बंदरे आणि मत्स्यव्यवसाय मंत्री असलम शेख (Aslam Shaikh) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. (MVA Govt Minister Aslam Shaikh Reaction on ONGC Barge P305 sinking Incidence)

हेही वाचा: सचिन वाझेपाठोपाठ आणखी एक अधिकारी पोलिस सेवेतून बडतर्फ

"राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी जे प्रयत्न करता आले, ते सर्व प्रयत्न आम्ही केले. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर दोषींना आम्ही सोडणार नाही. एवढं मोठं वादळ येणार याची कल्पना दिली असतानाही हे सगळं घडलं, याला पूर्णपणे ONGC चे व्यवस्थापन जबाबदार आहे. या प्रकरणात काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत ५० मृतदेह सापडले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात असून जे-जे कंत्राटदार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे", अशी माहिती असलम शेख यांनी दिली.

हेही वाचा: "सातच्या आत घरात'च्या उदंड चर्चेनंतर..."; भाजपचा टोला

"या घटनेत झालेली मनुष्यहानी भरून निघणं शक्य नाही. पण केंद्राने मृतांच्या नातेवाईकांना मदत केली पाहिजे. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी होणे हे योग्य आहे. मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे आणि त्या आधारावर तपास सुरू आहे. ONGC केंद्र सरकारच्या अखत्यारित येते, त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकरणी संपूर्ण कारवाई केली पाहिजे", असे मतही असलम शेख यांनी व्यक्त केले.

हेही वाचा: ठाकरे सरकारच्या मंत्र्याविरोधात 'भाजप'ने थोपटले दंड

याबाबत नवाब मलिक म्हणाले...

"तौक्ते चक्रीवादळाची साऱ्यांनाच पूर्वकल्पना होती. राज्य सरकार आणि IMD च्या माध्यमातून याबद्दलचे इशारे देण्यात आले होते. ONGC ने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि ७०० कामगारांचा जीव धोक्यात टाकला. वादळामुळे एक बार्ज बुडाल्यानंतर अनेक लोकांचा मृत्यू झाला. अनेक जास्त जण बेपत्ता आहेत. शेकडो लोक मृत्यूशी झुंज देत असताना कोस्टगार्ड्स आणि नौदलाच्या जवानांनी त्यांना वाचवलं. या साऱ्याची जबाबदारी ONGC चीच आहे. या विषय चर्चेत आल्यानंतर पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यावर चौकशी समिती नेमत आहेत. पण केवळ चौकशी समिती नेमून चालणार नाही. जे कोणी जबाबदार व्यक्ती आहे, त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे. आणि जे दोषी असतील त्यांना शिक्षा व्हायलाच हवी", अशी मागणी राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी केली.

loading image
go to top