बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

बारवी धरणाची उंची वाढवल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात ते पूर्ण क्षमतेने भरले आहे...

बदलापूर : बारवी धरणाची उंची वाढवल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात ते पूर्ण क्षमतेने भरले असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र सोनजे यांनी दिली.

जुन्या क्षमतेनुसार 68.60 मीटर उंची होती. त्यावर चार मीटर उंचीचे 11 दरवाजे बसविण्यात आले असल्याचे मुख्य अभियंता राजेंद्र सोनजे यांनी सांगितले. गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरले. धरणाचे सर्व म्हणजे 11 दरवाजे स्वयंचलित असल्याने आपोआप उघडले गेले आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

पाऊस ज्या प्रमाणात कमी-जास्त होईल त्या प्रमाणात दरवाजे उघडले जातील. म्हणून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही राजेंद्र सोनजे यांनी केले. या आधी कोणत्याही प्रकारचा पाण्याचा विसर्ग बारवी धरणातून झाला नसल्याचे सोनजे म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Barvi dam in badlapur filled to full capacity