

Mumbai’s Historic BDD Chawls Set for Modern Makeover
esakal
वर्षानुवर्षे १८० चौरस फुटांच्या घरात वास्तव्यास असलेल्या बीडीडीवासीयांना सर्व सोयीसुविधांनी सज्ज असे ५०० चौरस फुटांचे घर देण्यासाठी म्हाडाकडून बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प राबवला जात आहे. पहिल्या टप्प्यात वरळी बीडीडीच्या ५५६ रहिवाशांना घराचा ताबा दिला असून, लवकरच नायगाव बीडीडी आणि उर्वरित वरळी बीडीडीच्या रहिवाशांना घराचा ताबा दिला जाणार आहे. तसेच टप्प्याटप्प्याने सर्व बीडीडीवासीयांचे घराचे स्वप्न पूर्ण केले जाणार आहे.