esakal | जबाबदारीचं भान ठेवा, कोरोनाला गांभीर्याने घ्या - मुख्यमंत्री
sakal

बोलून बातमी शोधा

जबाबदारीचं भान ठेवा, कोरोनाला गांभीर्याने घ्या - मुख्यमंत्री
  • कोरोनाची लक्षणे ८० टक्के लोकांमध्ये दिसत नाहीत. स्थलांतरित आणि लॉकडाऊन शिथिल केल्याने प्रवास करीत असलेल्या नागरिकांमुळे ज्या जिल्ह्यांत रुग्ण नव्हते तिथेही प्रादुर्भाव दिसू लागला आहे.
  • एकीकडे राज्याचे अर्थचक्र सुरू करीत असलो तरी त्यामुळे आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढते, हे लक्षात घेऊन विषाणूचा पाठलाग जास्त गांभीर्याने करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिले.

जबाबदारीचं भान ठेवा, कोरोनाला गांभीर्याने घ्या - मुख्यमंत्री

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाची लक्षणे ८० टक्के लोकांमध्ये दिसत नाहीत. स्थलांतरित आणि लॉकडाऊन शिथिल केल्याने प्रवास करीत असलेल्या नागरिकांमुळे ज्या जिल्ह्यांत रुग्ण नव्हते तिथेही प्रादुर्भाव दिसू लागला आहे. एकीकडे राज्याचे अर्थचक्र सुरू करीत असलो तरी त्यामुळे आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढते, हे लक्षात घेऊन विषाणूचा पाठलाग जास्त गांभीर्याने करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिले.

ही बातमी वाचली का? तीन माणसं बोलली की रडली..? महाविकास आघाडीवर भाजपचा पलटवार 

संस्थात्मक विलगीकरणात ठेवलेल्या रुग्णांची नियमित तपासणी करणे खूप महत्त्वाचे आहे. घराघरांत सर्वेक्षण करून रुग्ण शोधणे महत्त्वाचे आहे. पुढच्या १० दिवसांत ऑनलाईन शिक्षणाचे पायलट प्रोजेक्‍ट सुरू करता येतो का हे पाहावे लागेल. काही चित्रपट व मालिका निर्माते यांना पावसाळ्यापूर्वी ग्रीन झोनमध्ये बाह्य चित्रीकरण करू देऊ शकतो का तेही पाहावे लागेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ही बातमी वाचली का? व्हायरल झालेल्या अधिसूचना खोट्या, सरकारकडून स्पष्टीकरण

.लॉकडाऊन हळूहळू शिथिल करीत आहोत. ते एकदम उठविणे अयोग्य आहे. लॉकडाऊन सुरू करताना ट्रायल पद्धतीने केले पाहिजे. काय सुरू करतो आहोत त्याविषयी नागरिकांमध्ये स्पष्ट कल्पना पूर्वीपासून असावी. त्यात अटी-शर्ती असाव्यात. त्या पाळल्या गेल्या नाहीत तर परत लॉकडाऊन करावा लागेल याची कल्पना असणे गरजेचे आहे, म्हणजे संभ्रम राहणार नाही, असाही इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

ही बातमी वाचली का? स्थलांतरीत कामगारच नव्हे तर दुकानदारही मुंबईबाहेर चालले; वाचा बातमी सविस्तर

१०४ या हेल्पलाईनवर तक्रार करा!
रुग्णालये जास्त दर आकारत असतील तर नागरिकांना १०४ या हेल्पलाईन तक्रार करता येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरून अशा तक्रारींची दखल घ्यावी. त्यासाठी नोडल अधिकारी नेमावा. प्रत्येक रुग्णालयाने उपचारांच्या दरांचे फलक रुग्णालयाबाहेर लावणे गरजेचे आहे. रुग्णालयांतील ८० टक्के बेड्‌सही आपण ताब्यात घेतले आहेत; पण त्याप्रमाणे तिथे अंमलबजावणी होते का ते प्रत्यक्ष पाहावे, अशा सूचना प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिल्या.

सर्व नागरिकांना कॅशलेस उपचार देणाऱ्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेची जिल्ह्यांत काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. रोगप्रतिकारशक्ती आपण कशी वाढवतो, रुग्णांना त्या दृष्टीने सुविधा कशा देतो ते महत्त्वाचे आहे. निवासी डॉक्‍टर्सची मोठी फळी आज कोरोना लढाईत आघाडीवर आहे. ते नवे डॉक्‍टर आहेत. त्यांचीही खूप काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांना सर्व संरक्षण साधने पुरवली पाहिजेत.
- राजेश टोपे, आरोग्यमंत्री.

loading image
go to top