
मुंबई ठाण्यासह संपुर्ण कोकणात पुढील काही तासात जोरदार पावसाची शक्यता आहे
मुंबई : मुंबई ठाण्यासह संपुर्ण कोकणात पुढील काही तासात जोरदार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणासह राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.
भिवंडीत किरकोळ वादातून अँसिड हल्ला; पाच जण जखमी; आरोपींविरोधात गुन्हा दाखल
मुंबईत दुपार पासून पावसाचे ढग दाटून आले असून ढगांचा गडगडाटही सुरु आहे.अधून मधून एक दोन सरी कोसळत आहेत.त्यामुळे पुढील काही तासात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.पावसाळी ढगांमुळे मुंबईची दृष्यमानताही ( व्हिजीबीलीटी) कमी झाली आहे.
डोंबिवलीत सातनंतर फेरीवाले रस्त्यावर; केडीएमसीच्या दंडात्मक कारवाईमुळे व्यापारी हैराण
उत्तर भारतातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झालेला असतानाच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सूनचा परतीचा प्रवास थांबला आहे. पुढील तीन दिवस मुंबई, ठाणे, कोकणासह राज्यातील अनेक भागात पावसाळी परिस्थिती राहणार आहे
---------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )