कोरोना काळात रेल्‍वे प्रवासात काळजी घ्या, वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना काळात रेल्‍वे प्रवासात काळजी घ्या, वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

इतर रोजगारांसाठी प्रवास करणाऱ्या व्‍यक्‍तींना या सेवेचा वापर करण्‍याची परवानगी नाकारण्‍यात आली. आगामी काळात रेल्वे सर्वांसाठी खुली करण्यात येईल. मात्र यासाठी काळजी घेणे आवश्यक असल्याचे फोर्टिस हॉस्पिटलचे चीफ इंटेन्सिव्हिस्‍ट डॉ. संदीप पाटील सल्ला देतात. 

कोरोना काळात रेल्‍वे प्रवासात काळजी घ्या, वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

मुंबई:  कोविड-19 महामारीदरम्‍यान सार्वजनिक वाहन सेवा आवश्‍यक कर्मचाऱ्यांपुरतीच मर्यादित आहे. इतर रोजगारांसाठी प्रवास करणाऱ्या व्‍यक्‍तींना या सेवेचा वापर करण्‍याची परवानगी नाकारण्‍यात आली. आगामी काळात रेल्वे सर्वांसाठी खुली करण्यात येईल. मात्र यासाठी काळजी घेणे आवश्यक असल्याचे फोर्टिस हॉस्पिटलचे चीफ इंटेन्सिव्हिस्‍ट डॉ. संदीप पाटील सल्ला देतात. 

डॉ. संदीप पाटील यांच्या मते, रेल्‍वेने प्रवास करताना प्रवाशी बसलेले किंवा उभे असले तरी त्‍यांच्‍यामध्‍ये 6 फूटांपेक्षा कमी अंतर असल्याने कोविड- 19 आजार होण्‍याचा धोका वाढू शकतो. त्यासाठी तीन पदरी फेस मास्‍क, हँड सॅनिटायझर आणि काही निर्जंतुक वाइप्‍स बाळगणे आवश्यक आहे. 

कामाला जाण्‍यापूर्वी साबण आणि पाण्‍याने हात स्‍वच्‍छ धुवा आणि त्‍यानंतर मास्‍क घाला. मास्‍क घातल्‍यानंतर कामाच्‍या ठिकाणी पोहोचण्‍यापर्यंत मास्‍कला स्‍पर्श करू नका किंवा काढू नका. बाहेर पडण्‍यापूर्वी ग्‍लोव्‍ह्ज घाला. कामाच्‍या ठिकाणी पोहोचल्‍यानंतर ग्‍लोव्‍ह्जची योग्‍यरित्‍या विल्‍हेवाट लावा.

अधिक वाचा-  मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांचे त्वरित स्थलांतर करावे

प्रवासादरम्‍यान वाहनांच्या पृष्‍ठभागांना स्‍पर्श करणे टाळावे. तिकिट मशिन्‍स, हँडरेल्‍स, लिफ्टची बटणे आणि बाक अशा वारंवार स्‍पर्श केले जाणाऱ्या पृष्‍ठभागांना स्‍पर्श करणे टाळा. या पृष्‍ठभागांना स्‍पर्श केला तर त्‍वरित साबण आणि पाण्‍याने हात स्‍वच्‍छ धुवा किंवा 60 टक्‍के अल्‍कोहोल असलेल्‍या सॅनिटायझरचा वापर करा. गर्दी करणे टाळा. रेल्‍वे स्‍थानकावर सार्वजनिक शौचालयांचा वापर केल्‍यानंतर साबण आणि पाण्‍याने हात स्‍वच्‍छ धुवा.

अधिक वाचा-  मेट्रो-3 मार्गावर कंपन नियंत्रणासाठी स्विस मशीनचा वापर, भारतात प्रथमच भन्नाट तंत्रज्ञानाचा वापर

रेल्‍वे स्‍थानकावर खाद्यपदार्थ, पाणी खरेदी करताना, स्‍वत:ची पाण्‍याची बाटली आणि फूड पॅकेट्स सोबत ठेवा. इतर प्रवाशांकडून पाण्‍याची बाटली मागू नका किंवा त्‍यांना देऊ नका. रेल्‍वे स्‍थानकावर खाद्यपदार्थ किंवा पाणी खरेदी केल्‍यास कॉन्‍टक्‍टलेस पेमेण्‍टचा वापर करा किंवा सुट्टे पैसे द्या. प्रवासादरम्‍यान खाण्‍यासाठी आणि पिण्‍यासाठी मास्‍क काढणे टाळा. त्‍याऐवजी कामाच्‍या ठिकाणी पोहोचण्‍याची वाट पाहा. कुठेही न थुंकता ते टाळावे. प्रवासादरम्‍यान घातलेला मास्‍क काढून टाका आणि त्‍याच्‍याऐवजी दुसरा नवीन मास्‍क घाला. अगोदर वापरलेला मास्‍क धुण्‍यासाठी किंवा विल्‍हेवाट लावण्‍यासाठी सीलबंद बॅगेमध्‍ये ठेवता येऊ शकतो. अशी साधीसोपी खबरदारी घेत आणि स्‍वच्‍छताविषयक नियमांचे पालन करत सुरक्षित प्रवास करू शकतो, असे डॉ. पाटील म्हणाले.

------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Be careful on train travel during the Corona period advice of medical experts

loading image
go to top