मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांचे त्वरित स्थलांतर करावे, | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांचे त्वरित स्थलांतर करावे,

"मिठी नदी पात्रातील क्रांती नगर, संदेश नगर येथील बाधित झोपडपट्टीधारकांना प्राधान्य देऊन त्यांचे त्वरित स्थलांतर करावे"

मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांचे त्वरित स्थलांतर करावे,

मुंबई : मिठी नदी पात्रातील क्रांती नगर, संदेश नगर येथील बाधित झोपडपट्टीधारकांना प्राधान्य देऊन त्यांचे त्वरित स्थलांतर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील झोपडपट्ट्यांचे स्थलांतर करण्याबाबत बैठकीचे आयोजन वर्षा या शासकीय निवासस्थानी करण्यात आले होते.

महत्त्वाची बातमी : आता थंडीतही चाखा रसाळ हापूसची मजा, हापुस नवी मुंबईत APMC त दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 1995 च्या कायद्यानुसार जे झोपडपट्टीधारक अपात्र होते त्यांना नियमानुसार 2011 च्या शासन निर्णयाप्रमाणे पात्र करून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. झोपडपट्टीधारकांना स्थलांतरित करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करून येथील कामांना गती देण्यात यावी. कुर्ला येथील बांधकाम मोकळ्या जागेमध्ये असून या ठिकाणी 17 हजार 200 घरे आहेत. यापैकी काही घरे मोडकळीस किंवा जीर्ण झाली आहेत. तसेच मीठी नदी पात्रात काही घरे आहेत, त्यांना प्राधान्य देऊन त्यांचे स्थलांतर करून इतर ठिकाणी त्यांना घरे बांधून देण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांनी दिले आहेत.

महत्त्वाची बातमी : नोव्हेंबरमध्ये हिट आणि कोल्डशॉक, तर डिसेंबरमध्ये मुंबई गोठणार

या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार अशोक लांडे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस व्ही आर श्रीनिवास, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे आदी उपस्थित होते.

( संपादन - सुमित बागुल )

Chief Ministers directive to immediately relocate affected slum dwellers in Mithi river basin

loading image
go to top