मेट्रो-3 मार्गावर कंपन नियंत्रणासाठी स्विस मशीनचा वापर, भारतात प्रथमच भन्नाट तंत्रज्ञानाचा वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रो-3 मार्गावर कंपन नियंत्रणासाठी स्विस मशीनचा वापर, भारतात प्रथमच भन्नाट तंत्रज्ञानाचा वापर

सर्व साधारण मेट्रो ट्रॅक्सची 22 व्हीडीबी इतकी कंपन शोषण क्षमता असते. मात्र, स्लीपर बॉक्समुळे ट्रॅक्सची कंपन शोषण क्षमता अधिक कमी होणार आहे

मेट्रो-3 मार्गावर कंपन नियंत्रणासाठी स्विस मशीनचा वापर, भारतात प्रथमच भन्नाट तंत्रज्ञानाचा वापर

मुंबई : कुलाबा वांद्रे सीप्झ मेट्रो 3 या मार्गावरून मुंबईकरांचा भुयारी प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी एमएमआरसीने (MMRC) स्विस कंपनीची मदत घेतली आहे. स्विस कंपनीच्या सहायाने एमएमआरसीने हाय व्हायब्रेशन अटेन्युएशन बुटेड ट्वीन स्लीपर ब्लॉक्सची निर्मिती प्रायोगिक तत्वावर सुरू केली आहे. ही ट्रॅक यंत्रणा अद्ययावत असून यासाठीच्या स्लीपर बॉक्सची निर्मिती वडाळा येथे सुरू केली आहे .अशा प्रकारचे आणखी एक मशीन लवकरच उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारचे ट्रॅक्स भारतात प्रथमच वापरण्यात येत आहेत.

सर्व साधारण मेट्रो ट्रॅक्सची 22 व्हीडीबी इतकी कंपन शोषण क्षमता असते. मात्र, स्लीपर बॉक्समुळे ट्रॅक्सची कंपन शोषण क्षमता अधिक कमी होणार आहे. शहरात संवेदनशील इमारती, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, चित्रीकरण स्टुडिओ इत्यादि आहेत. तसेच पुरातन इमारती आणि दाटीवाटीची वस्ती असल्याने मुंबई शहरासाठी ही यंत्रणा योग्य ठरणार आहे.

महत्त्वाची बातमी "तेजस एक्‍स्प्रेस'ने घेता येणार सहलीचा आनंद; पर्यटनाला 15 डिसेंबरपासून सुरुवात

संपूर्ण प्रकल्पाला 2 लाख 1 हजार सहाशे स्लीपर ब्लॉक्स लागणार असून अशा प्रकारची 2 मशीन्स महिन्याला 12 हजार स्लीपर ब्लॉक्सची निर्मिती करतील.

कंपंनांची परिणामकारकता कमी करण्यासाठी आणि प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी ही पद्धत सर्वोत्तम आहे. आवश्यकतेप्रमाणे योग्य वेळेत स्लीपर बॉक्सची निर्मिती करण्यासाठी ही एकूण प्रक्रिया मेमेसर्स  सोनविले यांच्या स्विस तज्ज्ञांच्या देखरेखी खाली पार पडत आहे असे एमएमआरसीचे प्रकल्प संचालक एस के गुप्ता म्हणाले.

( संपादन - सुमित बागुल )

first time in india swiss made machine used to reduce vibrations on metro rail tracks

loading image
go to top