मोठी बातमी - एसटी बँकेच्या पदावर राहण्यासाठी निवृत्तीचे वय वाढवण्याचा घाट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

एसटी बँक एम्प्लाॅईज युनियनचा प्रयत्न, काँस्ट्राईब एसटी कर्मचारी संघंटनेचा विरोध

मुंबई : शिवसेना प्रणीत एसटी बँक एम्प्लाॅईज युनियनचे कार्याध्यक्ष आणि इतर सक्रीय कार्यकर्त्यांचे 58 वर्षात निवृत्ती होणार असल्याने, एसटी बँक कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी एसटी बँक कर्मचारी युनियनचे अध्यक्ष माजी खासदार आनंदराव अडसूळ बँक प्रशासनावर दबाव आणत असल्याचा आरोप काँस्ट्राईब एसटी कर्मचारी संघंटनेचे सरचिटणीस सुनिल निरभवनने यांनी केला आहे.

राज्य सरकारने अद्याप सेवानिवृत्तीच्या वयात बदल केलेला नाही. त्याशिवाय एसटी कर्मचारी संघंटनेच्या कर्मचाऱ्यांचे वय सुद्धा 58 वर्ष आहे. मात्र, एसटी बँकेतील संचालक पदांवर टिकून राहण्यासाठी शिवसेना प्रणित एसटी बँक एम्प्लाॅईज युनियनच्या कार्यध्यक्षांची निवृत्ती वाचवण्यासाठी युनियनच्या अध्यक्षांनीच प्रयत्न चालवले आहे. 

मुंबईत कोरोनाचं तांडव कायम, मुंबईत वाढलेत 'इतके' रुग्ण; मुंबईची रुग्णसंख्या ३६ हजारांच्या पार

एसटी बँक कर्मचारी युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ हे एसटी बँकेच्या प्रशासकिय अधिकाऱ्यांवर दबाव आणून संचालक मंडळाची तातडीने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन निवृत्तीचे वय वाढवण्यासंदर्भात ठराव मंजूर करण्यासाठी सक्ती करीत आहे. मात्र, संचालक मंडळाची मुदत संपली असतांना,  लाॅकडाऊनमूळे बँकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. अशा वेळी संचालक मंडळास धोरणात्मक निर्णय घेता येणार नसतांना, बँक कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा निर्णय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सेवानिवृत्तीचे वय वाढल्यास एसटी बँकेला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. तर बँकेच्या संचालक मंडळाने एसटी कामगारांच्या हिताचा विचार करण्यापेक्षा एसटी कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या हिताचा विचार केला जात असल्याने, एस टी कामगारांचा विश्वास घात केला जात असल्याचा आरोप काँस्ट्राईब एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनिल निरभवने यांनी केला आहे.

मोठी बातमी - लॉकडाऊनमध्ये केलं 'असं' काही आणि अबु आझमी यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा... 

राज्यभर आंदोलनाचा इशारा

एस टी महामंडळाच्या मालकीच्या जागेत बँकच्या 50 शाखा व मध्यवर्ती कार्यालयाचे कामकाज सुरू आहेत. मात्र एसटी बँकेने गेल्या 30 वर्षाँमध्ये अद्याप राबविण्यात आली नाही. त्याशिवाय भरती बढती मध्ये आरक्षण धोरणाची अंमलबजावणी केली नाही. अशा परिस्थितीत एसटी बँकेच्या पदावर टिकून राहण्यासाठी शिवसेवा प्रणित एसटी बँक एम्प्लाॅईज युनियनच्या पदाधिकाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वयामध्ये वाढ केल्यास कास्ट्राईब एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस निरभवने यांनी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

बँक इंडस्ट्रिच्या नियमानुसार बँकेतील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात आले आहे. त्यासाठी आम्ही भांडतो आहे. अशी भुमीका एसटी बँक एम्प्लाॅईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांची आहे. - सुनिल साळवी, कार्याध्यक्ष, एसटी बँक एम्प्लाॅईज युनियन

to be on ST bank employee post for tow more year demand for increase in retirement age


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: to be on ST bank employee post for tow more year demand for increase in retirement age