बाबासाहेबांमुळे इथपर्यंत पोहचलो : विष्णू सवरा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

वाडा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दीन-दलित तसेच उपेक्षित समाजावर अनंत उपकार आहेत. त्यांनी दिलेल्या संविधानिक अधिकारामुळेच माझ्यासारख्या अतिसामान्य कुटुंबातील व्यक्तीला राज्याच्या मंत्रिपदाचा मान मिळाला, असे कृतज्ञतापूर्वक उद्‌गार आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी वाडा येथे शनिवारी काढले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाड्यातील सिद्धार्थनगर येथे कार्यक्रम घेण्यात आला. त्या वेळी सवरा बोलत होते. ते पुढे म्हणाले की, बाबासाहेबांना अपेक्षित असणारा भारत घडविण्यासाठी केंद्र व राज्यातील भाजप सरकार कटिबद्ध आहे. दीन-दलितांसाठी असणाऱ्या विकासाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप पवार, वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष गीतांजली कोळेकर, नगरपंचायतीचे भाजप गटनेते मनीष देहरकर, नगरपंचायत स्वच्छता समिती सभापती राम जाधव, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र थोरात यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 

Web Title: Because Dr Babasaheb Ambedkar I am here now say Vishnu Savra