
मुरुड : निसर्ग चक्रीवादळाच्या अस्मानी संकटामुळे मुरुड तालुक्यातील घरांसह बागायतदारांचे अतोनात नुकसान झाल्याने मुरुड या पर्यटन तालुक्याची 10 ते 15 वर्षे पिछेहाट झाली आहे. मुरूड तालुक्यांतील 72 गावे अंधारात असुन विज वितरण कंपनीच्या अकार्यक्षमतेमुळे दुरुस्तीचे काम धिम्या गतीने सुरू राहिल्यास नागरिकांना काळोखात रहावे लागणार आहे.
हे ही वाचा : मुख्यमंत्र्याच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पितृशोक
वीज नसल्याने नागरीकांची दमछाक होत आहे. बँकाचे व्यवहार तसेच आर्थिक संस्थांचे कामकाज ठप्प असुन जनरेटर्सचा धंदा तेजीत असुन इनव्हर्टर बॅटरी चार्जीगसाठी प्रति तास 750 रुपये आकारले जात आहेत. घरघंटी व पिठाची गिरणी बंद झाल्याने तयार पिठ खरेदी करावे लागत आहे.
विज नसल्याने खडी मशिन बंदचा फटका बांधकाम व्यावसायिकांना परिणामी या व्यवसायातील लोकांचे रोजगार ठप्प आहेत.लोकप्रतिनिधींनी दौरे केले तथापि वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडुन विज पुरवठा करण्याबाबत कोणतेही आश्वासन देण्यात आले नाही. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात नुकसानग्रस्तांना मदतीचा हात मिळेल व विजेची समस्या सुटेल असे वाटले होते; मात्र दौरा अचानक रद्य झाल्याने सर्वसामान्यांची घोर निराशा झाली आहे.
महत्वाची बातमी : अखेर लोकल ट्रेन धावली! पण केवळ मर्यादित प्रवाशांसाठी, 'या' आहेत अटी
ठाणे परिमंडळाकडुन 15 कर्मचारी मदतीसाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र ही कुमक अतिशय कमी आहे. लोकप्रतिनिधी वा तालुका दंडाधिकाऱ्यांकडुन सातत्याने या संदर्भात जो आढावा घेणे गरजेचे होते तो घेतल्याचे चित्र दिसत नाही. गेल्या 12 दिवसात या संदर्भात नागरिकांनी संयम राखला; मात्र अधिकाऱ्यांची दिरंगाई होत असल्याने नागरिकांचा उद्रेक झाल्यास ती जबाबदारी वितरण कंपनी घेणार आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
because of nisarg cyclone village dont get light in murud, read full story
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.