"व्हॅलेंटाईन डे'- गुलाबाचं फुल पडतंय महागात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 February 2020

प्रेमी युगुलांचा उत्सव असलेला व्हॅलेंटाईन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्‍वभूमीवर लाल गुलाबांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे; तर मागणीइतका पुरवठा होत नसल्याने फुलांच्या भावात मागील आठवड्याच्या तुलनेत 30 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

नवी मुंबई : प्रेमी युगुलांचा उत्सव असलेला व्हॅलेंटाईन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्‍वभूमीवर लाल गुलाबांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे; तर मागणीइतका पुरवठा होत नसल्याने फुलांच्या भावात मागील आठवड्याच्या तुलनेत 30 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात या फुलांच्या 20 नगास 160 रुपये; तर किरकोळ बाजारात एका फुलास 25 ते 30 रुपये दर मिळत आहे. 

ही बातमी वाचली का? 'हे' ११ नगरसेवक करणार राष्ट्रवादीत घरवापसी; गणेश नाईकांना मोठा धक्का...

आज (ता.14) "व्हॅलेंटाईन डे' आहे. या दिवशी प्रेमाच्या आणाभाका घेत गुलाबाचे फूल देण्याची प्रथा आहे. या पार्श्‍वभूमीवर गुलाबाची आवक वाढली आहे. राज्यातील नागपूर, पुणे येथून; तर गुजरातमधील सुरत, बडोदा; मध्य प्रदेशातील इंदोर; तेलगंणातील हैदराबाद येथून दिल्ली येथे फुले पाठवली जात आहेत. त्याचबरोबर या ठिकाणाहून मुंबईमध्येदेखील मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होत आहे. व्हॅलेंटाईन डेमुळे फुलांची मागणी वाढल्याने, त्यांच्या दरात देखील वाढ झाली आहे. मागील आठवड्यात फुलांचे 20 नग 100 रुपयांना मिळत होते. आता त्यामध्ये वाढ होऊन, तीच फुले 160 रुपयांना मिळत आहेत. किरकोळ बाजारातदेखील दरात वाढ झाली आहे. फुलाच्या एका नगास 25 ते 30 रुपये दर आकरला जात आहे. 

ही बातमी वाचली का? चीनहून परतला, अन् त्याला भरली कोरोनाची धडकी!

सध्या समाजमाध्यमांद्वारे छायाचित्र; तसेच चित्रफीत पाठवून प्रेम व्यक्त करण्याच्या भावना दृढ होत आहेत.; मात्र असे असतानाही लाल गुलाबास मोठी मागणी आहे. मात्र ती अपेक्षेपेक्षा कमी आहे. उत्पादनखर्चाच्या तुलनेत भाव कमी मिळतो. त्यातच फवारणी करताना जास्त निगा राखावी लागत असल्याने शेतकरी गुलाबांची लागवड कमी प्रमाणात करत आहे. नेहमीच तुलनेत 70 टक्केच लागवड केली जाते; तर पांढऱ्या व पिवळ्या फुलांनादेखील मागणी आहे. 
- अनिल रोडे, व्यापारी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Because of Valentine's Day An increase in the demand for gulab roses