Court
Esakal
नवी मुंबई : महापालिकेकडून अनधिकृत बांधकामावर होणारी पाडकामाची कारवाई रोखण्यासाठी थेट बेलापूर न्यायालयाचा बनावट स्थगिती आदेश तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. न्यायालयाने स्थगिती दिलेली नसताना आदेशाच्या कॉपीत फेरफार करून, न्यायाधीशांची बनावट स्वाक्षरी करून हा खोटा दस्तऐवज तयार करण्यात आला आहे. सीबीडी पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.