बेलापूर : मतदान यंत्रात बिघाड Election Results 2019 esakal

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

नवी मुंबईतील बेलापूर मतदार संघातील एका मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे समोर आले आहे.

बेलापूर : नवी मुंबईतील बेलापूर मतदार संघातील एका मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे समोर आले आहे. ३ नंबरचे मतदान यंत्र हँग झाल्याने, या यंत्रामधील मते मोजता आली नाहीत. त्यामुळे या मशीनमधील मतमोजणी सर्व फेऱ्याची मोजणी झाल्यानंतर करण्यात येणार असल्याची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती यांनी दिली. ही मशीन तुर्भे हनुमान नगर येथील असल्याची माहिती देण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: belapur vidhansabha morning trends