esakal | टाकाऊपासून टिकाऊ! वापरलेल्या टेट्रा पॅकपासून तयार होणार शाळेतील बेंच
sakal

बोलून बातमी शोधा

टाकाऊपासून टिकाऊ! वापरलेल्या टेट्रा पॅकपासून तयार होणार शाळेतील बेंच

टाकाऊपासून टिकाऊ! वापरलेल्या टेट्रा पॅकपासून तयार होणार शाळेतील बेंच

sakal_logo
By
कृष्णा जोशी

मुंबई : आज काल प्रत्येक खाद्यपदार्थ पॅकिंगच्या स्वरुपात मिळतो. त्यातच ज्युस किंवा दूध यांसारखे द्रव्य पदार्थ खासकरुन टेट्रा पॅकमध्ये मिळतात. परंतु, अनेकदा हे टेट्रा पॅक (tetra packs)वापरल्यानंतर ते फेकले जातात. ज्यामुळे कचरा निर्माण होतो. म्हणूनच हे टेट्रा पॅक डंपिंग ग्राऊंडमध्ये न टाकता त्यापासून शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच तयार करण्यात येणार आहेत. सुमारे पाच लाख टेट्रा पॅकपासून हे बेंच (benche) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘कार्टन्स ले आओ, क्लासरूम बनाओ’ या उपक्रमाअंतर्गत हे बेंच तयार करण्यात येणार आहेत.

तयार झालेले हे बेंच माहीम (प.) येथील सिटी ऑफ लॉस एंजेलिस स्कूलला देणगी स्वरूपात देण्याय येणार आहेत.तसंच आरयूआर ग्रीनलाइफ, सहकारी भांडार आणि रिलायन्स फ्रेश यांच्याशी सहकार्यातून हा उपक्रम राबविला जाईल. पर्यावरण रक्षणासाठी ग्राहकांनी वापरलेली टेट्रापॅक वर नमूद केलेल्या दुकानांमध्ये जमा करण्याचं आवाहनदेखील करण्यात आले आहे. (benches-be-made-local-schools-used-tetra-packs)

पुर्नप्रक्रिया केलेली हे बेंच दिसायला सुंदर तसेच मजबूत व टिकाऊ असतात. त्यांच्याद्वारे पर्यावरण जपणुकीचा व टाकाऊ वस्तूंच्या पुर्नवापराचा सामाजिक संदेश दिला जातो. कचऱ्याचे वर्गीकरण आणि पुनर्वापर यांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी टेट्रा पॅक करत असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. या उपक्रमाला बृहन्मुंबई महानगरपालिकेनेही पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा: Lockdown नंतर फिरायला जाताय? रांचीमध्ये जाऊन घ्या विदेशातील फिल

"जी नॉर्थ प्रभागातील माहीममधील सिटी ऑफ लॉस एंजेलिस स्कूल ही मुंबईतील महापालिकेद्वारे चालवली जाणारी पहिली सीबीएसई शाळा आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांनाही चांगल्या सोयी मिळतील तसेच त्यांच्यावर पर्यावरण जपणुकीचेही संस्कार होतील. त्यामुळे सर्व मुंबईकरांनी या उपक्रमाला पाठिंबा द्यावा", असे प्रभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर म्हणाले.

संपादन : शर्वरी जोशी

loading image
go to top