‘गुगल’कडून सव्वा कोटी पॅकेज!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

गोरेगाव - ‘गुगल इनकॉर्पोरेशन’तर्फे मुंबईकर विद्यार्थी आदित्य पालीवाल याला तब्बल एक कोटी २० लाखांची नोकरी मिळाली आहे. १६ जुलैपासून तो कामावर रुजू झाला. सातत्याने अभ्यासात केलेल्या मेहनतीचे फळ मिळाल्याची भावना त्याने व्यक्त केली.

आयआयटी बंगळुरुच्या इंटिग्रेटेड एम. टेकमधील २२ वर्षीय आदित्यला गुगलतर्फे भरघोस पगाराची संधी चालून आली. विशेष म्हणजे ‘गुगल’ने या कामासाठी जगभरातील सहा हजार तरुणांमधून केवळ ५० तरुणांची निवड केली आहे.

आदित्य म्हणाला, ‘नोकरीची ऑफर मार्चमध्ये मिळाली होती. अचानक आलेल्या संधीने मी हरखून गेलो. विविध कामाच्या संधी येतच होत्या. मात्र अशी संधी म्हणजे कोणी माझ्याशी चेष्टा तर करीत नाही ना, असेही वाटले.’

शालेय शिक्षण वांद्र्यातील आर्य विद्यामंदिर आणि के. सी. महाविद्यालयातून पुढील शिक्षण घेणारा आदित्य अभ्यासात पूर्वीपासूनच हुशार होता. २०१८ मध्ये झालेल्या ‘एसीएम इंटरनॅशनल कॉलेजिएंट प्रोग्रामिंग’ स्पर्धेत आदित्य अंतिम फेरीत दाखल झाला होता. 

आदित्यच्या यशामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. कौतुकास्पद बाब आहे. आदित्यला एकदा महाविद्यालयात येण्याचे निमंत्रण पाठवणार आहे. इतर विद्यार्थ्यांनीही त्याचा आदर्श घ्यायला हवा.
- प्रा. हेमलता बागला, प्राचार्या, के. सी. महाविद्यालय

Web Title: Bengaluru student Aditya Paliwal Rs 1.2 Cr package will work for Google's AI team